12th Fail ने मारली बाजी, विक्रांत मेस्सी ठरला सरस (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२०२३ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गौरव करताना, ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत विजेत्यांची घोषणा केली. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केलेल्या चित्रपटांना मान्यता देण्यात आली.
२०२३ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या “द ट्वेल्थ फेल” या चित्रपटाने दोन पुरस्कार पटकावले आहेत. “द ट्वेल्थ फेल” ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर विक्रांत मॅसीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे “जवान” साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या शाहरुख खानसोबत आपला खास विजय शेअर केला. २५ वर्षापेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवलेल्या शाहरूख खानचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
कथल – अ जॅकफ्रूट मिस्ट्रीला ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला अलिकडेच झालेल्या एका समारंभात मोठा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला संपूर्ण मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘धिंडोरा बाजे रे! – रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. वैभवी मर्चंटने हे गाणे कोरिओग्राफ केले. राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
विक्रांत मेस्सी झाला भावूक
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर विक्रांत मेस्सी म्हणाला, “माझ्या कामाला या सन्मानासाठी पात्र मानले याबद्दल मी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी आणि ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ज्युरींचे आभार मानतो.” अभिनेता पुढे म्हणाला, “मी विधू विनोद चोप्रा जी यांचेही आभार मानतो. आज माझे २० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझा अभिनय आवडला आणि हा चित्रपट पुढे नेणाऱ्या प्रेक्षकांचेही मी मनापासून आभार मानतो.”
‘शाहरुखसोबत पुरस्कार शेअर करताना आनंद होत आहे’
अभिनेता पुढे म्हणाला की, माझ्यासाठीही खूप आनंदाची गोष्ट आहे की मी शाहरुख खानसारख्या मोठ्या कलाकारासोबत माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार शेअर करत आहे. मी माझा पुरस्कार त्या सर्व लोकांना समर्पित करतो ज्यांना अनेकदा दुर्लक्षित केले जाते आणि जे दररोज कठीण परिस्थितींशी झुंजतात. याशिवाय, अभिनेत्याने विधू विनोदसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला. ज्यामध्ये त्याने लिहिले, ‘आपण करून दाखवले सर..’
‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना
‘१२वी फेल’ एका खऱ्या कथेवर आधारित
१२वी फेलबद्दल सांगायचे झाले तर, विक्रांत मेस्सीचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. जो आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. तो एका कठीण संघर्षानंतर आयपीएस बनला. हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. विक्रांतने ही भूमिका खूप चांगली साकारली. त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले. विक्रांतने ‘छपाक’ आणि ‘हसीन दिलरुबा’ सारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपली छाप सोडली आहे.