पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि फवाद खानविषयी केलं महत्वाचं विधान
काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशातून प्रत्येक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहे. भारतामध्ये, अनेक पाकिस्तानी गोष्टींवर बंदी आणत असताना तेथील कलाकारांवर बंदी आणली जात आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खानसह अनेक गायक आणि कलाकारांवरही देशामध्ये बंदी आणली जात आहे. या दरम्यान गायक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जावेद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
जावेद अख्तर यांनी पीटीआयशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. जेव्हा त्यांना भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले. जावेद अख्तर म्हणाले, “तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची दोन उत्तरं आहेत. जेव्हा नुसरत फतेह अली खान, गुलाम अली आणि नूरजहाँ भारतात आले तेव्हा त्यांचे इथे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. फैज अहमद ते महान कवींपैकी एक होते. ते पाकिस्तानात राहत होते. स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांना एका राष्ट्रप्रमुखासारखी वागणूक देण्यात आली होती. मला पाकिस्तानच्या लोकांबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण त्यांना दिलेल्या वागणुकीची त्यांनी केव्हाच परतफेड केली नाही. पण आमच्या कलाकारांना त्यांच्याकडून केव्हाच अशी आदराची वागणूकही मिळाली नाही. हे आणखी किती काळ चालू राहील?”
VIDEO | When asked about whether Pakistani artists should be allowed in India, lyricist Javed Akhtar (@Javedakhtarjadu) says, “The first question should be whether we should allow the Pakistani artists here. There are two answers, both of them are equally logical. It has been a… pic.twitter.com/ox9b3CfbLy
— Press Trust of India (@PTI_News) April 29, 2025
मोहन आगाशे बायकोच्या खूनाचा कट कसा रचणार ? ‘आतली बातमी फुटली’चा रंजक टीझर रिलीज
याशिवाय मुलाखतीत जावेद अख्तर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, “पाकिस्तानातल्या अनेक मोठ मोठ्या कवींनी लता मंगेशकर यांच्यासाठी कविता लिहिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ६० आणि ७० च्या दशकात त्या भारतातील सर्वात लोकप्रिय कलाकार होत्या. पण तरीही सुद्धा, पाकिस्तानात लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम का झाला नाही? पाकिस्तानाल्या नागरिकांचे लता मंगेशकर यांच्यावर प्रेम होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे तक्रार करणार नाही. पण, काही अडथळे होते. पाकिस्तानच्या व्यवस्थेमुळे हे अडथळे निर्माण झाले होते, त्यामुळे भारताने हे एकतर्फी प्रयत्न करणे योग्य नाही.”
‘माझ्या मेहनतीला आता चार चाके…’, शहनाजने खरेदी केली आलिशान कार, किंमत जाणून व्हाल धक्का!
त्याच मुलाखतीत जावेद अख्तर यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता, आपण पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी द्यावी की नाही ? या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद अख्तर म्हणाले की, “या प्रश्नाचा विचार योग्य वेळी करता येईल. आशा आहे की, येत्या काही वर्षांत पाकिस्तानच्या मनात भारतीयांप्रतीची काही वेगळा समज असेल. पाकिस्तानचा भारताबद्दलचा दृष्टिकोन चांगला असेल. मग यावर विचार करता येईल. पण सध्या, हा प्रश्न विचारू नये. ते अजिबात शक्य नाही.”