(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिलने आज मर्सिडीज जीएलएस कार खरेदी केली आहे, ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. आता या पोस्टवर सेलिब्रिटी आणि तिचे चाहते शहनाजचे अभिनंदन करत आहेत. अभिनेत्रीची कार पाहून चाहते देखील आनंदी झाले आहे. सोशल मीडियावर शहनाजने फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट देखील लिहिली आहे.
शहनाज गिलने मर्सिडीज जीएलएस खरेदी केली
शहनाजने तिचे अनेक अद्भुत फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि या फोटोंसोबत एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. या फोटोंमध्ये शहनाज पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या डेनिम जीन्समध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिने आज हा लूक खास करून नवीन गाडी खरेदी करण्यासाठी तयार केला होता. आज शहनाजने मर्सिडीज जीएलएस खरेदी केली आहे, ज्याची किंमत कोट्यवधी आहे. “स्वप्नांपासून ते ड्राईव्हवेपर्यंत,” शहनाजने तिच्या सुंदर फोटोंना कॅप्शन दिले. माझ्या मेहनतीला आता चार चाके झाली आहेत. मला खरोखरच धन्य वाटत आहे! वाहेगुरु, मी तुमची आभारी आहे.” असं तिने म्हटले आहे.
अभिनेत्रीला सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
आज शहनाजने नवीन कारसोबतचे तिचे फोटो शेअर करताच, अनेक सेलिब्रिटींनी तिला नवीन लक्झरी कार खरेदी केल्याबद्दल अभिनंदन केले. अनिल कपूरची मुलगी आणि फॅशन डिझायनर रिया कपूरने शहनाजचे अभिनंदन केले आणि लिहिले, ‘मला खूप अभिमान आहे.’ या कमेंटबद्दल शहनाजने रियाचे आभार मानले आहेत. हार्डी संधूने लिहिले, ‘अभिनंदन’, तर वरदान नायकने लिहिले, ‘अभिनंदन तू पात्र आहेस शहनाज मी तुझ्यासाठी खुश आहे’.
चाहत्यांनी केले अभिनंदन
सेलिब्रिटींव्यतिरिक्त, अनेक चाहत्यांनीही शहनाजला तिच्या यशाबद्दल अभिनंदन करताना कमेंट केल्या आहेत. शहनाजच्या एका चाहत्याने लिहिले, ‘अभिनंदन, तू हे केलेस’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘सनाला अभिनंदन’, तिसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘ही तर फक्त सुरुवात आहे’, चौथ्या चाहत्याने लिहिले, ‘गोल्डन गर्लला अभिनंदन’, तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘अभिनंदन, असेच चमकत राहा’, आणि दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘अभिनंदन, तू आयुष्यात जिंकली आहेस’.
Housefull 5 Teaser: धमाकेदार कॉमेडीसह परतला अक्षय कुमार, मजामस्तीसोबत सस्पेन्सचाही होणार धमाका!
मर्सिडीज जीएलएसची भारतातील किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील मर्सिडीज-बेंझ GLS ची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे खालीलप्रमाणे असते. बेस मॉडेलची किंमत १.३४ कोटी रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत १.३९ कोटी रुपयांपर्यंत जाते. जीएलएस पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.