Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

"लैला मजनू" हा कल्ट चित्रपट बनवणारे इम्तियाज अली आता "हीर रांझा" नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. "धुरंधर" फेम अभिनेत्री सारा अर्जुनचे नाव आता या प्रकल्पाशी जोडले जात असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ची घोषणा
  • ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री चमकणार चित्रपटात
  • चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” या चित्रपटातून सारा अर्जुनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रणवीर सिंगसोबत चमकली. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली. रणवीरसोबत साराच्या कामाचेही खूप कौतुक झाले. “धुरंधर” या चित्रपटाच्या रिलीजपासून ती जास्त चर्चेत आली. आता तिचे नाव एका प्रेमकथेच्या चित्रपटाशी जोडले जात असल्याचे समोर आले आहे. तो चित्रपट म्हणजे इम्तियाज अली यांचा “हीर रांझा” हा चित्रपट आहे. दिग्दर्शकांनी एकता कपूरसोबत सह-निर्मिती केली आहे. इम्तियाजचा भाऊ साजिद अली “हीर रांझा” चे दिग्दर्शन करणार आहे.

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री

२०१८ मध्ये, इम्तियाज आणि साजिद यांनी “लैला मजनू” नावाचा चित्रपट प्रदर्शित केला, ज्यामध्ये तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी यांनी अभिनय केला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. लैला मजनू” नंतर, इम्तियाज आता “हीर रांझा” नावाचा चित्रपट बनवत आहेत. ज्याची त्यांनी १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे रोजी या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासून, मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल वादविवाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. निर्माते नवीन कलाकारांना घेण्याचा विचार करत आहेत. आता, सारा अर्जुनचा विचार केला जात आहे असे वृत्त आहे.

सारा अर्जुनचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही

मिड डेच्या वृत्तानुसार, सारा अर्जुन ही महिला मुख्य भूमिकेसाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे. एका सूत्राने सांगितले की, “हीर रांझा” टीम चित्रपटासाठी एका नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. “धुरंधर” नंतर, सारा आजच्या काळातील सर्वात आशादायक तरुण अभिनेत्रींपैकी एक म्हणून उदयास आली आहे. म्हणूनच, हीरच्या भूमिकेसाठी साराचे नाव विचारात घेतले जात आहे. “हीर रांझा” साठी तिचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, जर सर्व काही व्यवस्थित राहिले तर ती चित्रपटात हिराची भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. या उन्हाळ्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे समोर आले आहे.

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

सारा अर्जुनचा पुढचा चित्रपट

तसेच, सारा अर्जुन सध्या “धुरंधर २” मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती पुन्हा एकदा रणवीर सिंगसोबत येलिनाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींची कमाई केली. “धुरंधर २” कसा कामगिरी करेल आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Dhurandhar actress sara arjun may be seen in imtiaz alis heer ranjha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष
1

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी
2

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

Pralay Movie : रणवीर सिंग गेला ‘पॅटर्निटी लिव्ह’वर! आगामी सिनेमाची शूटिंग ढकलली पुढे, कधी येणार ‘प्रलय’?
3

Pralay Movie : रणवीर सिंग गेला ‘पॅटर्निटी लिव्ह’वर! आगामी सिनेमाची शूटिंग ढकलली पुढे, कधी येणार ‘प्रलय’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.