(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. भर दिवसा, साडे पाच वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवन्या शैलेश बोंबे या चिमुकलीने बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला आहे. ही घटना सकाळी सुमारे ९:४५ वाजता घडली असून, त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभाग आणि प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. वारंवार बिबट्याचे हल्ले होत असताना देखील सरकारकडून ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मराठी अभिनेता हेमंत ढोमेनेही या घटनेचा संताप व्यक्त करत यावर ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला विनंती केली आहे.
या दुर्दैवी घटनेवर अभिनेता हेमंत ढोमेने X अकाऊंटवर प्रतिक्रिया देत भावनिक संताप व्यक्त केला आहे. ही घटना त्याच्या स्वतःच्या गावात घडल्याचं सांगत त्याने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.”सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला आहे, परंतु सरकारकडून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत. मानव आणि जंगली प्राण्यांच्या या संघर्षात दोघांनाही जगता यावं यासाठी दूरगामी उपाययोजनेची गरज आहे. नुसते पिंजरे लावून काही होणार नाही,”असं हेमंत ढोमेने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे… आमचे खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला आहे परंतु सरकार कडून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत… मानव आणि जंगली प्राण्यांच्या या संघर्षात दोघांनाही जगता यावं या करता दूरगामी उपाययोजनेची गरज आहे.
नुसते… pic.twitter.com/cixgBrrKXs — Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) October 13, 2025
फक्त फोटोशूट नव्हे, अभिनेत्री अश्विनी महांगडे शेतात राबली सुद्धा! नेटकऱ्यांकडून कौतुक… पहा फोटो
पुढे त्याने “नाहक बळी जात राहणार आणि याचे रूपांतर लोक कायदा हातात घेणार असं होणार. सरकारने लवकरात लवकर यात लक्ष घालायला हवं! लोक शिक्षण आणि इतर बऱ्याच बाबींची गरज आहे. खूप काही करता येऊ शकतं”, असंही म्हटलं आहे.