(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सिनेविश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धी आणि झगमगाटापासून दूर राहून आपली माती आणि मूळाशी नातं टिकवणारी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवणारी अश्विनी महांगडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेत ‘अनघा’ ही भूमिका साकारणारी अश्विनी खऱ्या आयुष्यात मात्र एक शेतकऱ्याची लेक आहे. आणि ती ही ओळख अत्यंत अभिमानाने जपत आहे. अश्विनी महांगडे ही सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कोणत्याही मालिकेमुळे नव्हे, तर तिच्या साधेपणा आणि मातीवरील प्रेमामुळे.
अलीकडेच अश्विनी महांगडेनं सोशल मीडियावर शेती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती भर उन्हात शेतात काम करताना दिसत आहे. डोक्यावर टोपलं, चेहऱ्यावर साधेपणा आणि डोळ्यांत मातीबद्दलचा अभिमान. असे हे फोटो सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.
या फोटोंसोबत तिनं लिहिलं, “हे फक्त फोटो नाहीत, तर यात भावना आहेत…” असं कॅप्शन तिने दिलं आहे. तिच्या या वाक्यातून माती आणि शेतीबद्दलचे तिचे प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक देखील केलं आहे. एका युजरने लिहिले की, तुझं खूप कौतुक वाटत गं तायडे… अभिनेत्री म्हणून बाजूला आणि जन्म घेतलेल्या मातीतलं नातं एका बाजूला म्हणजेच साधी सरळ एक मुलगी. तर दुसऱ्याने म्हटले रॉयल शेतकरीण. आणखी एकाने लिहिले की, मातीतलं माणूस अश्विनी ताई किती वेळा मन जिंकणार. अशा प्रतिक्रिया देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही अश्विनीने शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. भर उन्हात, मातीत राबणाऱ्या अश्विनीच्या या फोटोंनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
‘गैरसमज निर्माण झाले…’, अरिजीत सिंगसोबतच्या भांडणावर सलमान खानने अखेर सोडले मौन; म्हणाला…
‘अनघा’ ही भूमिका साकारणारी अश्विनी खऱ्या आयुष्यात शेतकऱ्याच्या घरात वाढलेली आहे. अश्विनी बऱ्याचदा गावाकडे जात असते आणि वेळ मिळेल तशी शेतीची कामं स्वतःहून करते. तिच्या या साधेपणामुळे आणि वास्तवाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे तिचे चाहते नेहमीच तिचं कौतुक करताना दिसतात.