
Adipurush – बहुचर्चित आणि बीगबजेट आदिपुरूष आज अखेर रिलीज झाला. या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता तर होतीच…..त्याचीच ही झलक आज चित्रपटगृहांबाहेर पाहायला मिळाली. आज सकाळी चित्रपटगृहांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. हैदराबादच्या सुदर्शन थिएटरमध्ये तर सकाळपासून शो हाऊसफुल्ल सुरू आहे. गर्दी इतकी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही.
रामायणावर आधारित हा चित्रपट असल्याने रामभक्त हनुमानासाठी थिएटरमध्ये एक आसनही राखीव ठेवण्यात आलं आहे. दिग्दर्शक ओम राऊत (om raut) यांनी थिएटर मालकांना चित्रपटादरम्यान हनुमानजीसाठी एक जागा सोडण्याचे आवाहन केले होते. अशी श्रद्धा आहे की जिथे रामकथा होते तिथे हनुमानजी नक्कीच असतात.
स्क्रिनिंगदरम्यान चक्क एक माकड थिएटरमध्ये घुसले
आदिपुरुषच्या स्क्रिनिंगदरम्यान एक माकड थिएटरमध्ये प्रवेश करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माकडाने थोडा वेळ स्क्रीनकडे बघून परत गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसलं. या माकडाला पाहताच लोकांनी अक्षरश: थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या…काही लोक हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप मानतात. जिथे हनुमानजींचे मंदिर आहे, तिथे माकडांचा वावर हमखास दिसतो.
Hanumanji watching #AadiPurush. pic.twitter.com/SyrR9Kk8kn — Брат (@1vincibl3) June 16, 2023
सोशल मीडियावर आदिपुरुष ट्रेंड
काल रात्रीपासून आदिपुरुष सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. या चित्रपटाबद्दल अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात. रामभक्त तर चित्रपटगृहात रामाचा नुसता जप करतायत.
तर, नेपाळमध्ये चित्रपटाचा निषेध, सीताच्या जन्मस्थानावरून वाद
आदिपुरुष या चित्रपटावरून नेपाळमध्ये वाद निर्माण झाला होता. चित्रपटातीला संवादामध्ये सीताला भारताची कन्या म्हटलं आहे.यावर, नेपाळी सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलायं. सीताचा जन्म भारतात नसून नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटातून तो संवाद काढून टाकला, त्यानंतर चित्रपटाला तिथे प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात आली.
हिंदितील आदिपुरूषची तिकीटविक्री पहिल्या दिवशी अडिच लाखांहून अधिक झाली आहे. त्यानुसार आगाऊ बुकिंगमधून 12 कोटींहून अधिक कमाई झाली आहे.
#Adipurush *advance booking*… Update till Thursday, 2.30 pm… ⭐️ #Hindi [#PVR + #INOX only]
Fri: 164,967
Sat: 110,304
Sun: 102,547
Total: 377,818 ⭐️ #Telugu [#PVR + #INOX only]
Fri: 93,456
Sat: 46,401
Sun: 29,565
Total: 169,422 https://t.co/12VqfsJTPA — taran adarsh (@taran_adarsh) June 15, 2023
ट्रेड एक्सपर्टचा अंदाज आहे की पहिल्या दिवशी चित्रपट 30 कोटींहून अधिकची ओपनिंग घेऊ शकतो.जर सर्व भाषा एकत्र केल्या तर हा आकडा 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. हा अंदाजे आकडा आहे. चित्रपट यापेक्षाही जास्त कलेक्शन करू शकतो.