Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, वाचा सविस्तर…

'आई कुठे काय करते' मालिकेचा ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मालिकेत अनिषची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुमंत ठाकरेने भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 01, 2024 | 06:01 PM
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, वाचा सविस्तर...

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, वाचा सविस्तर...

Follow Us
Close
Follow Us:

टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर ठरलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून टेलिकास्ट होणाऱ्या ह्या मालिकेचा स्टार प्रवाहवर ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिका संपणार, अशी घोषणा केल्यापासून अनेक कलाकार सोशल मीडियावर सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. आता अशातच मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मालिकेत अनिषची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुमंत ठाकरेने भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांसोबत अनिषने म्हणजेच अभिनेता सुमंत ठाकरेने फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत सुमंत ठाकरेने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे,

“पहिली नेहमी खास असते! आज ‘आई कुठे काय करते’मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. हे थोडं अस्वस्थ करणारं आहे, पण हा प्रवास समृद्ध करणारा आहे. कधी कधी संधी विचित्र मार्गाने येते, तो मार्ग जितका विचित्र तितकाच ती स्वीकारल्यावरचा प्रवास सुखद, असं माझं मत आहे. मी प्रदीप दादाचा नेहमी ऋणी राहीन. नमिता वर्तक तुझं मार्गदर्शन, योग्य निर्णय घ्यायला मदत करणं, पात्र समजावून सांगणं, चूक सुधारायला लावणं, नको त्या गोष्टींसाठी उगाच रागावणं सगळ्याचसाठी खूप धन्यवाद… तुझ्यामुळे ही संधी मिळाली. डीकेपीसारखं प्रोडक्शन हाऊस मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. वेळोवेळी त्यांचं काम आणि कार्यपद्धत खूप काही शिकवून गेली. थँक्यू डीकेपी…” “आमचे कॅप्टन रवी सर. त्यांच्या संवेदनशील, डोळस, शांत आणि चिकित्सक दृष्टिकोनामुळे हा “प्रवाह” इथवर आला आहे! मराठीरंगभूमी घडवणाऱ्या, जगवणाऱ्या दिग्गजांचे त्यांच्यावर संस्कार आहेत. नटाला समाधान देणारे क्षण सरांच्या कामात असतात. त्याची शैली हे दाखवते की त्यांची दिग्दर्शनाची ताकद काय आहे, भविष्यात त्यांच्या हातून अनेक कलाकृती घडाव्या, हीच ईच्छा. त्यांचे खंदे सहकारी,तितकेच गुणी, आपला वेगळा विचार ठामपणे मांडणारे, पडद्यामागून शांतपणे काम करणारे आणि तेवढ्याच खोडकर पणे एखाद्या शब्दाचा चोथा करणारे आयुष्यभरासाठी लाभलेले मित्र, कोटी कंपनीचे मालक तुषार आणि सुबोध दादा…” “मुग्धाचं संवादलेखन नेहमीच “वाह!” म्हणायला लावणारं होतं. तुषार, चित्रा आणि लेखन विभागाचे खूप आभार. प्रत्येक डिपार्टमेंटमधील मित्रांशी जडलेली मैत्री आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्या गुणी हरहुन्नरी हुशार सहकलाकारांनी हा प्रवास फुलवला. मधुराणीने साकारलेली आई मला कधीही विसरता येणार नाही. ईला ताईसारख्या प्रेमळ आजी जी खऱ्या आयुष्यात आणखीन जास्त प्रेम करते. मेकअप रूममध्ये क्रिकेट, नाटक, सिनेमा, इतिहास, कला अशा विषयांवर झालेल्या गप्पा नेहमी आठवतील. २ वर्षे एका घरात राहून, मला स्वतःच्या जगात सामावून घेतलं, माझ्या जगात सामील होऊन माझ्या आयुष्याचा मोठा भाग बनलास ओंकार, तुझे आभार कसे मानू . अपूर्वा, तुझं वेळोवेळी मदत करणं, इतक्या आठवणी, सीन्स, त्यावर चर्चा, गाणी, आणि माझी गॉडमदर होणं, यासाठी मनापासून धन्यवाद!” “या प्रवासाने मला शिकवलं की एक मालिका का लोकप्रिय ठरते ती फक्त कथा नाही तर त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रेमाने आणि मेहनतीने साकार होते. मला भेटलेली माणसं आयुष्यभर साथ देतील, हे समाधान आहे. ‘आई कुठे काय करते’ ही माझ्या पदार्पणाची मालिका आहे आणि कायम हृदयाच्या जवळ राहील. अनिश…खूप प्रेम!”

Web Title: Aai kuthe kay karte actor sumant thakre shared emotional post after serial off air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 06:01 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
1

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर
2

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’,  ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.