Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त

कलर्स मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या 'आई तुळजाभवानी' मालिकेने प्रेक्षकाच्या मनात अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केले. महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप आशीर्वादामुळे मालिकेने अल्पावधीतच मोठा टप्पा पार केला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 17, 2025 | 03:53 PM
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली आई तुळजाभवानी या मालिकेने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच एक अढळ स्थान निर्माण केले आहे महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप आशीर्वादामुळे आज मालिकेने आपले 100 यशस्वी भाग पूर्ण केलेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले,महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले.

“तेनु काला चश्मा जचदा ऐ, जचदा ऐ गोरे मुखड़े ते”, सई ताम्हाणकरच्या फायर लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गंमतीदार नातेही पाहायला मिळत आहे. कधीच आई होऊ शकणार नाही हा देवी पार्वतींना असलेला शाप, ते त्यांचा “जगदजननी” जगन्माता हा सगळ्या विश्वाचे आईपण जपणारा प्रवास प्रत्यक्ष महादेवांना ही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची कधी ना पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची माने जिंकत आहे. आई तुळजाभवानी मालिकेत तुळजाभवानीच्या रूपात दिसत आहे अभिनेत्री पूजा काळे आणि महादेवाच्या रूपात आहे अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र.

मालिकेचे कोल्हापूरमध्ये गेले पाच ते सहा महिने ही मालिका चित्रनगरीमध्ये शूटिंग करत आहोत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीची गाथा प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आली आहे अशीच या माध्यमातून आई तुळजाभवानीची सेवा आमच्याकडून घडत राहो अशी इच्छा मालिकेची निर्माते आणि दिग्दर्शक शशांक शेंडे यांनी व्यक्त केली.

हाच तो चाकू, ज्याने सैफवर झाला होता हल्ला; शस्त्रक्रियेनंतरचा फोटो आला समोर

मला ही भूमिका मिळाली हे माझं भाग्यच आहे माझ्या ध्यानीमनी नव्हते ,मी कथ्थक डांसर असल्याने माझे काही सोशल मीडियावर चे व्हिडिओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर मला मेसेज आला आणि या भूमिकेविषयी विचारले तेव्हा भेटल्यावर त्यांना मी स्पष्ट बोलले की माझा अभिनय प्रांत नाही आहे नाहीये तर हे कसे मी निभावू शकते ? त्यांनी एक विश्वास दिला की तुम्ही करू शकता आणि काही सराव केल्यानंतर ह्या गोष्टी जमल्याने आज तुमच्या समोर उभी आहे. मला विश्वास बसत नाही की मी ही भूमिका करते बहुदा आई तुळजाभवानीच्या मनात असेल की ही माझ्याकडून सेवा घडावी असे मत मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूजा काळे यांनी मांडले.

ही मालिका रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर लोकांच्या भेटीस येत आहे आणि इथून पुढे सुद्धा असेच आपले प्रेम या मालिकेवर राहू हे असे आवाहन मालिकेचे निर्माते दिग्दर्शक यांनी केले.

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘इलू इलू’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

Web Title: Aai tuljabhavani serial completed 100 episodes pooja kale expressed gratitude colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • Television Shows

संबंधित बातम्या

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
1

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”
2

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट
3

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट

“उपाध्येंचा ‘राशीयोग’ बरा नव्हता…”; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…
4

“उपाध्येंचा ‘राशीयोग’ बरा नव्हता…”; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.