मराठीसह आता बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या वेगवेगळ्या भूमिका मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या कामामुळे आणि भूमिकेमुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्रीने नुकतेच तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसह शेअर केलेल्या या फोटोवर नजर टाकुयात.
सई ताम्हाणकरच्या फायर लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सईने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ताजे फोटो शेअर केले आहे. जे पाहून चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहेत. तिच्या लूकने त्यांना वेडे केले आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा चेक्स कॉर्सेट परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक फायर दिसत आहे. तसेच या कॉर्सेटवर तिने काळ्या रंगाचा चष्मा देखील घातला आहे.
सईच्या चेहऱ्यावर हा काळ्या चष्मा खूपच शोभून दिसत आहे. तसेच तिने या ड्रेसवर तिचे सुंदर आणि शायनी केस मोकळे ठेवले आहेत. तिच्या फोटोमधील अदा पाहून चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.
सईने या ब्लॅक अँड व्हाईट चेक्स कॉर्सेटवर काळे मोठे बूट देखील घातले आहेत. ज्यामुळे तिचा लूक एकदम क्लासी दिसत आहे. सईने या ड्रेसवर हटके पोज देऊन फोटो शूट केले आहे.
सईने या बॉसी आणि क्लासी लूकवर आकर्षित मेकअप केला आहे. ज्यामध्ये फाउंडेशन, ब्लुश आणि न्यूड लिपस्टिकचा समावेश आहे. अभिनेत्रीचा हा लूक आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.