...तर सैफवर हल्ला झालाच नसता, त्या रात्री घरात नेमकं काय घडलं? नवी माहिती समोर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. अभिनेत्यावर हा हल्ला खंडणीसाठी करण्यात आला होता. दरम्यान, अभिनेत्यावर ज्या हत्याराने हल्ला करण्यात आला होता. आता त्याचे फोटोज् समोर आले आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने सैफच्या पाठीच्या कण्यातून धारदार चाकूचा एक तुकडा काढला होता. हा शस्त्राचा तुकडा चाकूसारखा दिसत आहे.
पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘इलू इलू’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित
हल्लेखोराकडे हेक्सा ब्लेडसारखे शस्त्र होते, अशी माहिती जेहच्या केअरटेकरने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले होते. पण हा शस्त्राचा तुकडा अगदी चाकूसारखा दिसतो. त्याचे फोटोज् आता लीलावती हॉस्पिटलने प्रसिद्ध केले आहेत. चाकूचा तुकडा तब्बल अडीच इंचाचा असलेला दिसत आहे. इतका मोठा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी सैफच्या पाठीच्या कण्यामधून काढला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हा तुकडा आणखी दोन मिमी आत घुसला असता तर दुखापत आणखी खोलवर गेली असती. सैफची तब्येत पूर्वीपेक्षा सध्या उत्तम आहे. त्याला आता आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये हलवण्यात आले आहे. त्याला संपूर्णपणे बरं होण्यासाठी जवळपास एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो.
डॉ. नितिन डांगे यांनी सैफवर उपचार केले. त्यांनी अभिनेत्याच्या तब्येतीची ताजी अपडेट दिली आहे. त्यानुसार, “सैफ अली खानची आता तब्येत पूर्णपणे व्यवस्थित आहे. हल्ल्यात अभिनेत्याला चार गंभीर जखमा तर दोन किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका चाकूचा 2.5 इंचाचा तुकडा त्याच्या पाठीत अडकला होता. हा चाकूचा तुकडा त्याच्या पाठीत खोलवर गेला असता तर त्याला लकवा मारला असता. पण देवाच्या आशीर्वादाने सैफची सर्जरी करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे आता तो सुखरुप आहे.”
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला दोन ते तीन दिवसांत सुट्टी देण्यात येईल. सध्या अभिनेत्याची फिजोयोथेरपी सुरू करण्यात आली आहे. तो लवकरच बरा होईल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. एका आठवड्यानंतर सैफ अली खान त्याचे शुटिंग सुरू करू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सैफचे चाहते अभिनेता ठणठणीत बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. इतक्या मोठ्या हल्ल्यातून सैफ वाचला आहे. जर घाव आणखी गहिरे असते तर सैफचं करिअर आणि जीव दोन्ही धोक्यात आला असता.