"मी बेकार मुलगी, कुठलंही काम करु शकत नाही..." आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. ज्यांची नावं जुनैद आणि आयरा अशी आहेत. त्याच्या लेकाने गेल्या वर्षीच अभिनयातून बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू केलं आहे. तर, लेकीने अभिनय क्षेत्रात करियर करण्या ऐवजी दुसरा आपआपला मार्ग निवडला आहे. आयरा अगस्तू नावाच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू मुलांना मदत करत असते. सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे, या मुलाखतीत तिने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. २७व्या वर्षीही काहीही कमवत नसल्याची खंत तिने एका मुलाखतीत बोलून दाखवली आहे. तर आमिरने लेकीला साथ देत ती करत असलेल्या कामाचा गर्व असल्याचं म्हटलं आहे.
‘अशी ही जमवा जमवी’ ची भव्य संध्याकाळ; अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
दरम्यान, आमिरने आणि आयराने अलीकडेच पिंकव्हिलाला मुलाखत दिली आहे. या दिलेल्या मुलाखतीत आयरा म्हणाली की, “मी २६ ते २७ वर्षांची आहे. माझ्या आई- वडिलांनी माझ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. पण तरीही मी एक बेकारच मुलगी आहे. मी कुठलंही काम करु शकत नाही.” आयरा खान असं म्हणाल्यानंतर अभिनेत्याने आपल्या लेकीला सपोर्ट केलं आहे. एखादा व्यक्ती किती पैसे कमावतो, यावरुन त्याचा दर्जा ठरवत नसल्याचं अभिनेता म्हणालाय. “तू पैसे कमावतेस की नाही. ते माझ्यासाठी गरजेचं नाही. तू चांगलं काम करत आहेस, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पैसा हा प्रत्यक्षात एक कागदाचा तुकडा आहे, खरंतर ते एक काल्पनिक रित्याच आहे..”, असं मुलाखती दरम्यान आमिर म्हणाला.
‘आभाळ रातीला’ गाण्याने सजना चित्रपटाची वाढवली रंगत; रसिकांच्या मनाला दिला नवा स्पर्श
मुलाखती दरम्यान आमिर पुढे म्हणाला की, ” आज समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे खूप वेगवेगळे टॅलेंट आहेत. पण, त्यांना पैसे कसे कमवायचे हे माहिती नाहीये. मग, म्हणून ते युजलेस आहेत का? ते पैसे कमवत नाहीत कारण आपण तयार केलेल्या या सिस्टिममध्ये ते फिट बसत नाही. मी आजवर अशा कित्येक लोकांना भेटलोय. काही लोक दुसऱ्यांना मदत करतात, पण ते त्याचा पैश्यांच्या माध्यमातून मोबदला घेतात. पण, जोपर्यंत तुम्ही लोकांना मदत करत आहात. तिथे पैशाचा विषय येत नाही. एक वडील म्हणून मला तुझा गर्व आहे. सुदैवाने तुझ्या आईवडिलांनी कमवून ठेवलं आहे. त्यामुळे तुला तुझी ऊर्जा पैसे कमावण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. त्याऐवजी तू लोकांना मदत कर”.