“लगान चित्रपट का तयार करताय?, एक दिवसही चालणार नाही... ”, जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य; आमिर खानचा खुलासा
जून २००१ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसते. चित्रपटातील कलाकारांचा जबरदस्त अभिनय, सुंदर गाणी, वेगळ्याच ताकदीचं चित्रपटाचं दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. तब्बल २४ ते २५ वर्षांनंतर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या आमिर खानने चित्रपटाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. देशासह परदेशातही कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ‘लगान’ चित्रपट फ्लॉप होईल, असं भाकित जावेद अख्तर यांनी केलं होतं. आमिरने हा खुलासा नुकताच एका मुलाखतीत केला आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर मिश्किल अंदाजात म्हणाला की, “मला लवकरच ६० वर्षे पुर्ण होणार आहेत, पण मला अजूनही १८ वर्षांचाच आहे की, काय ? असं वाटतं. पण जेव्हा मी मला आरशात पाहतो, त्यावेळी माझा आत्मविश्वास ढासळतो. पुढे अभिनेता म्हणाला की “मी ‘लगान’ चित्रपटाची निर्मिती करत असताना खूप घाबरलो होतो. चित्रपटाची स्क्रिप्ट जावेद अख्तर यांनी ऐकली होती. ते या चित्रपटाचे गीतकार होते. जावेद साहेबांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की, ‘तुम्ही काय मूर्खपणा करताय?’ मी विचारलं की जावेद साहब काय झालं? आणि त्यांनी मला लगेच भेटायला बोलावलं. आशुतोषने चित्रपटाची कथा त्यांना ऐकवली होती. जावेद अख्तर यांनी मला फोन करून तातडीने त्यांच्या घरी भेटायला बोलावलं.”
अशोक मामांनी भैरवीला दिलं आठ दिवसांचं चॅलेंज, मालिकेत मोठा ट्वीस्ट
आमिर पुढे म्हणाला, “मी त्यांना घरी भेटायला गेल्यानंतर ते मला म्हणाले, ‘तू का ही चुक करतोय ? तुम्ही हा चित्रपट का तयार करताय? हा चित्रपट एक दिवसही चालणार नाही.’ मी विचारलं का? चित्रपटाचं कथानक तर खूप चांगले आहे. ते म्हणतात की, ‘हे पाहा… आजवर एकही कोणत्याही खेळावर बनवलेला चित्रपट चाललेला नाही, क्रिकेटचा एकही चित्रपट चाललेला नाही. तुम्ही अवधी भाषेत बोलताय, त्यामुळे चित्रपट कोणाला समजेल आणि आता सगळे महागडे कपडे घालतायत, स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करतायत आणि तुम्ही धोतर-बंडी घालून गावात हा चित्रपट करताय.’ त्यांच्याकडे असे बरेच मुद्दे होते,”
कलर्स मराठीवर प्रेक्षकांसाठी महिला दिन विशेष भागांची मेजवानी, जाणून घ्या
पुढे आमिर म्हणाला, “त्यांचा एक असा मुद्दा होता की, तुम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला आहे, ज्या ज्या चित्रपटांना अमिताभ यांनी आवाज दिला होता, ते सर्व चित्रपट फ्लॉप झाले होते. हे मलाही बच्चन साहेबांनी सांगितलं होतं, जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी ज्या ज्या चित्रपटांना आवाज दिले ते चित्रपट फ्लॉप झालेत लक्षात ठेव, बाकी मला इथे आवाज द्यायला काहीच अडचण नाही, असं बच्चन म्हणाले होते. जावेद अख्तर म्हणाले तुम्ही हेही करून झालंय. आता तर तुमचा चित्रपट चालणारच नाही. पण आम्हाला चित्रपटाच्या कथेवर विश्वास होता, पण तो खूप कठीण चित्रपट होता. त्या काळी तो खूप महागही होता. ३ तास ४२ मिनिटांचा चित्रपट आणि पाच गाणी. हा चित्रपट तेव्हाच्या ऑस्करच्या टॉप ५ च्या यादीत गेला होता.”
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीच्या काही शंका आणि आव्हानांना न जुमानता, ‘लगान’ चे आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कौतुक झाले. चित्रपटाला टॉप ५ मध्ये ऑस्कर नामांकनही मिळाले. २५ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर ३४ कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला होता. ‘लगान’ चित्रपट २००१ मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.