Aatli Baatmi Phutli Movie: 'आतली बातमी फुटली' चित्रपट केव्हा रिलीज होणार ?
काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही आतल्या गोटातून मिळतात, तर काही अगदी अपघाताने… थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते. मराठी सिनेविश्वात सध्या अशाच एका बातमीची जोरदार चर्चा सुरु असून, ही बातमी नेमकी काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ६ जूनची वाट पाहावी लागणार आहे. दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांचा ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून, ही बातमी नेमकी कोणी आणि कशी फोडली? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.
Chhaava Movie: संसदेत होणार ‘छावा’चं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत विशाल पी. गांधी यांनी आजवर अनेक नामंकित ब्रँड्स च्या जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांच्या मुक्ता आर्ट्स कंपनीसोबत जोडल्या गेलेल्या विशाल यांचा या क्षेत्रातील अनुभव हा प्रचंड दांडगा आहे. आपल्या वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्यांना जैनेश इजरदार यांची सहदिग्दर्शक म्हणून साथ लाभली आहे.
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.
धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, ‘हलगट’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर