Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी’ किरण माने यांची वडिलांसाठी मन हेलावणारी पोस्ट

किरण माने यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या अखेरच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. किरण यांच्या वडिलांनी त्यांच्याच मांडीवर अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 04, 2025 | 06:14 PM
'…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी' किरण माने यांची वडिलांसाठी मन हेलावणारी पोस्ट

'…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी' किरण माने यांची वडिलांसाठी मन हेलावणारी पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांच्या वडिलांचं ३० मार्च २०२५ रोजी निधन झाले आहे, ते ८६ वर्षांचे होते. किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिलेली. अशातच आता किरण माने यांनी वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या अखेरच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. किरण यांच्या वडिलांनी त्यांच्याच (किरण यांच्या) मांडीवर अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. काय म्हणाले किरण जाणून घेऊया.

‘तो मी नव्हेच…’ ऑनलाईन फसवणूक झालेल्या प्रकरणावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया…

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने काय म्हणाले ?

…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी ! खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला… नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्‍या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो… पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीनचार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो… दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच.” काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले… माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला. ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर !’ दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते… ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता !”
तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे.
जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ।। – किरण माने…

‘१२ लाख द्या अन् रेड कार्पेटवर चाला…’; कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या नावाखाली ‘खंडणी’ चा बाजार, धक्कादायक खुलासा!

Web Title: Actor kiran mane shared emotional post on instagram about her father death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
3

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
4

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.