जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्नं केले पवनने पूर्ण
त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे.
‘रूबाब’ आता मराठी ZEE5 वर पहा, काय आहेत 5 खास कारणं; ड्रामा, भावना, कथा सर्वच एका क्लिकवर
काय म्हणाला पवन?
इतकी मोठी झेप घेताना पवन म्हणाला की, ‘एका खेड्यातून आलेल्या तरुणासाठी हा प्रवास खूप अभिमानास्पद आहे. माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा नसता तर हे शक्य झालं नसतं. मला माझं नाव खूप मोठं करायचं आहे. म्हणतात ना, स्वप्नं पाहिली की ती नक्की पूर्ण होतात आणि मी माझी स्वप्नं नक्की पूर्ण करणार.’ आगामी काळातही प्रेक्षकांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहतील, अशी अपेक्षा असल्याचे अभिनेता पवन याने सांगितले.
अभिनयाबरोबरच मी कलरीपयट्टू, जिम्नॅस्टिक्स आणि कुस्ती यांसारख्या कलादेखील शिकत आहे. या नव्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करताना मला खूप अभिमान वाटतो आणि त्याचा मला माझ्या कामातही फायदा होत आहे असे त्याने आवर्जून सांगितले.
कसा आहे पवनचा प्रवास
पवनचा प्रवास हा खेड्यापासून सुरु झाला असला तरीही प्रत्येक स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी नक्कीच आदर्शवत आहे. स्वप्नं मोठी असली तरीही ती पूर्ण करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे. असं असल्याशिवाय काम पूर्ण होत नाही हेच पवन चौरेच्या या प्रवासाने दाखवून दिले आहे. पवनकडे पाहून अन्य खेड्यातील कलाकारही आपली स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतील असा विश्वास त्याने इतरांना दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अभिनेता Bhushan Pradhan लवकरच अडकणार लग्नबंधनात; फोटो शेअर करत जाहीर केली लग्नाची तारीख, पाहा Photo






