Sonali Sood Accident: अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सोनाली सूद गंभीर जखमी
नागपूर: बॉलीवूड अभिनेता सोनू सूदबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. सोनू सूदच्या पत्नीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई- नागपूर महामार्गावर सोनाली सूदचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सोनाली सूद जखमी झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला ते अजूनही समजू शकलेले नाही. सोनाली सूदवर नागपूरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेता सोनू सूदची पत्नी आपल्या कुटुंबासोबत मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. दरम्यान हा प्रवास करत असताना तिच्या गाडीला अपघात झाल्याच समोर येत आहे. यामध्ये ती जखमी झाली आहे. दरम्यान तिच्यावर नागपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अभिनेता सोनू सूद तातडीने नागपूरकडे रवाना झाला आहे.
सोनऊ सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. सोनाली सूद ही मूळ आंध्र प्रदेशमधील रहिवाशी आहे. सोनू सूद आणि सोनाली सूद यांना दोन अपत्य आहेत. ती देखील एक प्रसिद्ध चित्रपट निर्मिती आहे.
सोनू सूद अडकला अडचणीत
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी हजर न राहिल्याने न्यायालयाने गुरुवारी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्याचा नुकताच ‘फतेह’ हा चित्रपट रिलीज होऊन गेला. सिनेमागृहात हा या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तसेच हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. याचदरम्यान आता ‘फतेह’ चित्रपटामधील अभिनेता सोनू सूद कायदेशीर प्रकरणात अडकला आहे.
Sonu Sood: सोनू सूद अडकला अडचणीत; अभिनेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण!
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा खटला लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी दाखल केला होता. मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्यांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याने केला आहे. वकिलाचे म्हणणे आहे की मोहित शुक्लाने त्यांना बनावट ‘रिझिका कॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी फसवले होते आणि सोनू सूदला या प्रकरणात साक्ष द्यावी लागली होती.
न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले
तथापि, न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवूनही, अभिनेता सोनू सूदने त्याकडे दुर्लक्ष केले. यावर न्यायालयाने आता अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, “सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट जारी करण्यात आले आहे परंतु तो हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे. आम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.” असे सांगितले गेले आहे.