(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी हजर न राहिल्याने न्यायालयाने गुरुवारी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्याचा नुकताच ‘फतेह’ हा चित्रपट रिलीज होऊन गेला. सिनेमागृहात हा या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तसेच हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. याचदरम्यान आता ‘फतेह’ चित्रपटामधील अभिनेता सोनू सूद कायदेशीर प्रकरणात अडकला आहे.
Fauji: ‘फौजी’मध्ये या बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात प्रभाससह साकारणार ही भूमिका!
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा खटला लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी दाखल केला होता. मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्यांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याने केला आहे. वकिलाचे म्हणणे आहे की मोहित शुक्लाने त्यांना बनावट ‘रिझिका कॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी फसवले होते आणि सोनू सूदला या प्रकरणात साक्ष द्यावी लागली होती.
न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले
तथापि, न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवूनही, अभिनेता सोनू सूदने त्याकडे दुर्लक्ष केले. यावर न्यायालयाने आता अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, “सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट जारी करण्यात आले आहे परंतु तो हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे. आम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.” असे सांगितले गेले आहे.
पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी
हे वॉरंट मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांना अभिनेत्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. अभिनेता हजर राहतो की नाही हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.