Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

वाळवा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे. अलीकडेच झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतकरी व मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 07:51 PM
शिरूर तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री कुटुंबिय झोपेत असताना बिबट्या आला अन्...

शिरूर तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री कुटुंबिय झोपेत असताना बिबट्या आला अन्...

Follow Us
Follow Us:
  • वाळवा तालुक्यात बिबट्याचा वावर प्रचंड वाढला
  • दहशतीमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत
  • वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Kolhapur News: वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर प्रचंड वाढला असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. शेतशिवार, ऊसतोड क्षेत्र, नदीकाठ आणि गावालगतच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. दोन दिवसांपूर्वी पेठ-नायकलवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकावर आणि अल्पवयीन मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

दैनंदिन जनजीवन विस्कळीत

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. शेतीकामासाठी पहाटे लवकर किंवा सायंकाळी उशिरा शेतात जाणे आता जिवावर बेतणारे ठरत आहे. ऊसतोड मजूर, महिला आणि दूध उत्पादक शेतकरी रोजचा प्रवास करताना जीव मुठीत धरून बाहेर पडत आहेत. अनेक गावांमध्ये पालकांनी मुलांना घराबाहेर पाठवणे बंद केले असून, शाळा आणि क्लासेसच्या वेळेवरही याचा परिणाम झाला आहे. सायंकाळ होताच गावांतील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले असले आणि गस्त वाढवल्याचा दावा केला असला, तरी ग्रामस्थांच्या मते या उपाययोजना अपुऱ्या आहेत. बिबट्याचा वावर केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे अधिक पिंजरे बसवणे, रात्रीची गस्त वाढवणे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांचे आवाहन

जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी समूहाने बाहेर पडावे, हातात काठी आणि टॉर्च ठेवावा तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करून या दहशतीतून मुक्त करावे, हीच मुख्य मागणी आता जोर धरत आहे.

Web Title: Walwa leopard terror frequent attacks villagers scared marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Accident News
  • farmer
  • kolhapur
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
1

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
2

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
3

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर
4

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.