अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपल्यात नसला तरी चाहत्यांच्या मनात तो कायम जीवंत आहे. 14 जून 2020 रोजी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे फॅन्स आजही त्याची आठवण काढतात. त्याच नाव पुन्हा चर्चेत येण्याच कारण म्हणजे अभिनेत्री अदा शर्माने (Adah Shrama) दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा वांद्रे येथील फ्लॅट खरेदी (Sushant Singh Rajput Flat) केला आहे. सुशांतच निधन झाल्यापासून या घराला कुणी भाडेकरु मिळत नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अदा शर्माने हा फ्लॅट खरेदी केला आहे.
[read_also content=”‘मैने प्यार किया’ सारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहीणाऱ्या गीतकार देव कोहलींचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखरेच श्वास! https://www.navarashtra.com/movies/maine-pyar-kiya-lyricist-dev-kohli-passes-away-at-82-dev-kohli-passes-away-nrps-449826.html”]
अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. वादात असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘द केरळ स्टोरी’मधील अदाच्या भूमिकेने लोकांची मने जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर आता अदाने स्वतासाठी घर घेतलं आहे.
सुशांत सिंग राहत होता त्या इमारतीचे नाव माउंट ब्लँक आहे. ते घर आता अदा शर्माने विकत घेतले आहे. ती या घरात कधी शिफ्ट होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांताचा हा फ्लॅट त्याच्या मृत्यूनंतर जास्त चर्चेत आला होता. सुशांत सिंह राजपूतने याच घरात आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या अपार्टमेंटला जास्त मागणी होती, त्यामुळे घराचे भाडे वाढले होते. आता अखेर हा सौदा अदा शर्माच्या हातात आला असून तिने हा फ्लॅट विकत घेतला आहे.
2021 मध्ये मुंबईत त्याचे सी-फेसिंग घर भाड्याने असल्याची बातमी आली होती. या दुमजली घरासाठी अभिनेता दरमहा साडेचार लाख रुपये भाडे देत होता.
अदा शर्माच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती ‘द केरळ स्टोरी’ मुळे खूप चर्चेत आहे. याशिवाय अदाची वेब सीरिज ‘कमांडो’ 11 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाली. अदा शर्मा लवकरच श्रेयस तळपदेसोबत ‘द गेम ऑफ गिरगिट’ या चित्रपटात दिसणार आहे.