शूटिंग करून वर्षभर होऊनही कामाचा मोबदला न मिळाल्याने अभिनेत्रीचा पोस्ट शेअर करत संताप, स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हणाली...
‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री मीरा जोशी सध्या चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, मीराने चित्रपटात काम करूनही मानधन मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचे पैसे थकवल्याची पोस्ट केली आहे. शिवाय तिने चित्रपटाच्या नावाचाही खुलासा केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.
धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारची विचित्र अवस्था
मीराने नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘जिद्दी सनम’नावाचा चित्रपट केला होता. अभिनेत्रीने ह्या चित्रपटामध्ये काम करुन आता जवळपास वर्ष झाला आहे. पण, अद्यापही तिला याचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे. घडलेला प्रकार सांगताना अभिनेत्री म्हणाली, “मी नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘जिद्दी सनम’नावाचा चित्रपट शूट केला होता. तेव्हापासून मला चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला माझ्या कामाचा मोबदला दिलेला नाही. मी माझ्या कामाचे पैसे मिळण्याची वाट पाहतेय. या घटनेला वर्ष लोटलेला आहे. तेव्हापासून मी प्रॉडक्शन टीमशी बोलतेय. cintaaofficial कडे तक्रार केली आहे. शिवाय, काही मराठी असोशिएन्सशी बोलत आहे. पण, कोणाचीच मदत झाली नाही. cintaaofficial तक्रार नोंदविण्यासाठी काही पैसेही घेतले. पण, काही उपयोग झालेला नाही. माझे पैसे मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं. पण, अजून मला एक रुपयाही मिळालेला नाही.”
शूटिंग करून वर्षभर होऊनही कामाचा मोबदला न मिळाल्याने अभिनेत्रीचा पोस्ट शेअर करत संताप, स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हणाली…
Badshah: हनी सिंगने तोंड उघडताच घाबरला बादशाह? गायकाने इन्स्टाग्राम अकाउंट केले बंद?
“मी या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण शूट केलं होतं. हे शूट मी २०२३ मध्ये ४ नोव्हेंबर, ५ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबर असे तीन दिवस केले. पहिल्या शेड्युलनंतर एका आठवड्यात पैसे दिले जातील, असंही मला सांगण्यात आलं होतं. चित्रपटामध्ये माझं कास्टिंग शेवटच्या क्षणी झाल्यामुळे त्यांच्याकडे माझं ॲग्रिमेंट बनवायला वेळ नव्हता. शिवाय, ॲग्रिमेंट नसल्यामुळे व्हॉट्सॲप चॅट हा पुरावा पोलीस ग्राह्य धरू शकत नाहीत. मला आता कुठलाच पर्याय दिसत नसल्याने हा मुद्दा मी इथे मांडण्याचं ठरवलं आहे. त्यांनी मला मेलमध्ये सांगितल्याप्रमाणे मी त्यांची परिस्थिती समजून घेत १ वर्ष वाट पाहिली. माझ्याप्रमाणेच टीममधील आणखी काही जणांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही.”
शूटिंग करून वर्षभर होऊनही कामाचा मोबदला न मिळाल्याने अभिनेत्रीचा पोस्ट शेअर करत संताप, स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हणाली…
पुढे अभिनेत्री म्हणाली, “होय, ही माझीच चूक आहे की, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला ३ नोव्हेंबरला कास्टिंगसाठी रात्री उशिरा कॉल केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूटिंगला गेले. त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतला, याचा आता मला पश्चाताप होतोय. त्यांच्याकडे ॲग्रिमेंट बनवायला वेळ नव्हता. पण, पहिल्या शेड्युलनंतर ॲग्रिमेंट बनवतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवणं, ही मोठी चूक होती.” त्यानंतर पुढे अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये निर्मात्यांचं आणि प्रॉडक्शन हाऊसचं नावं आणि नंबर देत मेलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केल्याचं मीराने म्हटलं आहे. आता अभिनेत्रीला कामाचा मोबदला केव्हा मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.