बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा आज (१७ मे) आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. नुसरतने ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. नुसरत गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले होते. नुसरत गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्रीने ‘प्यार का पंचनामा’, ‘छोरी’, ‘सेल्फी’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इंडस्ट्रीत काम करत असताना, अभिनेत्रीच्या आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा ती नैराश्यात गेली. त्या काळाबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…
एका मुलाखतीत नुसरत भरुचाने सांगितलं होतं की, “छोट्या छोट्या गोष्टींनी माझे मनोबल वाढवले होते. ‘लव्ह, सेक्स और धोखा’ हा माझा चित्रपट फार छान चालला. त्यानंतर माझा ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. मी या गोष्टींमुळे फार आनंदी होते. मग ‘आकाशवाणी’ नावाचा चित्रपट आला आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मी खूप दुःखी आणि निराश होते. मला चित्रपटासाठी पूर्ण पैसे मिळाले नाहीत. मी निर्मात्यांना सांगितले की माझ्यामुळे त्यांना त्यांचे पैसे गमवावे लागले याचा मला वाईट वाटतं.
मुलाखती दरम्यान नुसरत भरुचाने सांगितले की, “मी दीड वर्ष डिप्रेस होते. मला काय करावं आणि काय करु नये, हेच कळत नव्हतं. मला पुन्हा एकदा ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटात कसं तरी कास्ट करण्यात आलं. आम्ही शूटिंग करत होतो. मला माहित नव्हते की काय होईल. पण त्या चित्रपटाने पुन्हा चांगली कमाई केली. या काळात मी काही इतर गोष्टी केल्या ज्या काम करत नव्हत्या. पण मी काम करत राहिले. जर मी हिंमत गमावली असती तर आज मी इथे नसते. तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा लागेल. मला खात्री होती की मी हे करू शकते.”
‘अशोक मा.मा.’ मालिकेत इंद्रनील कामतची एन्ट्री, भैरवीच्या आयुष्यात कोणते बदल होणार?
नुसरतने टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. मात्र, चित्रपटांमध्ये झळकल्यावर अभिनेत्रीला अधिक लोकप्रियता मिळाली. नुसरतने २००६ मध्ये ‘जय मां संतोषी’ चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘कल किसने देखा’,’ताजमहल’, ‘लव सेक्स और धोखा’, ‘प्यार का पंचनामा’, ‘आकाश वाणी’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘ड्रीम गर्ल’, ‘जय मम्मी दी’, ‘छलांग’, ‘अजीब दास्तान’, यांसारखे चित्रपट केले. अभिनेत्रीचा गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘छोरी २’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून अभिनेत्रीला दमदार प्रतिसाद मिळाला.