Ashok Ma Ma Serial Enterd To Actor Indraneil Kamat
कलर्स मराठीवरील “अशोक मा.मा.” ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक पात्राचं नातेसंबंधातील गुंतागुंतीचं आणि भावनिक प्रवास प्रेक्षकांना भुरळ घालतो आहे. आता या प्रवासात एक नवं वळण येणार आहे. भैरवीचा जुना मित्र ‘अर्जुन बेलवलकर’ तिचा बॉस म्हणून मालिकेत येणार आहे. अर्जुनच्या येण्याने काय समीकरण बदलणार ? मालिकेत कोणते ट्विस्ट येणार हे हळूहळू कळेलच.
अर्जुनची भूमिका कलर्स मराठीवरील पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेतील इंद्रनील कामत साकारणार आहे. भैरवी म्हणजेच रसिक वाखारकर पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेत सावीच्या भूमिके दिसली. तेव्हा अर्जुन आणि सावीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता देखील रसिक प्रेक्षक उत्सुक आहेत त्यांना पुन्हाएकदा मालिकेत बघायला. तेव्हा नक्की पहा महारविवार एका तासाचा विशेष भाग, १८ मे, अशोक मा.मा. दु. २ आणि रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श असणारा ‘अमायरा’चा ट्रेलर प्रदर्शित
अशोक मा.मा. मालिकेतील अर्जुन म्हणजेच इंद्रनील कामत म्हणाला, “पुन्हाएकदा कलर्स मराठीवर स्वतःला पाहताना खूपचं आनंद होतो आहे. पहिली संधी मला याच वाहिनीने दिली होती, टेलिव्हिजन माध्यम काय आहे हे समजून घेण्याची. आणि यावेळेस अजून एक सुवर्णसंधी मला याच वाहिनीने दिली आणि ती म्हणजे अशोक मामांसोबत काम करण्याची. मला असं वाटतं प्रत्येकाचं स्वप्नं असंत त्यांच्यासोबत काम करण्याचं. लहानपणापासून आपण त्यांचं काम बघतो आहे, त्यांना अनुभवतो आहे, मला खरचं असं कधीच वाटलं नव्हतं त्यांच्या बाजूला सुद्धा मला उभं राहता येईल, त्याचं काम उभं राहून बघता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. कारण हे स्वप्नवत आहे माझ्यासाठी आतासुद्धा मी त्यांच्यासोबत शूट करतो आहे. मी त्याना असंख्य प्रश्न देखील विचारतो आहे. कारण, हि संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. मला हिमालयाच्या सावलीत असल्यासारखं वाटतं आहे. काम तर त्यांचं मोठचं आहे पण ते माणूस म्हणून देखील ग्रेट आहे. या मालिकेत काम करण्याचे महत्वाचे कारण ठरले अशोक मामा. या मालिकेद्वारे रसिका सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा काम करताना मज्जा येते आहे, खूप मजेशीर आहे. कारण पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेच्या सेटवर आम्ही प्रचंड धम्माल मस्ती केली आहे. जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. त्यामुळे जितकी मज्जा आम्हांला येते आहे शूटिंग करताना तितकीच प्रेक्षकांना देखील येईल याची मला खात्री आहे.”
नैराश्यानंतर कुटुंबाशी संबंध तोडण्याबाबत अमाल मलिकने सोडले मौन, म्हणाला- ‘माझे पालक…’
भैरवी आणि अर्जुन हे शाळेपासूनचे वर्गमित्र. अर्जुन तिच्या वर्गात, तिच्याच बाकावर बसणारा मुलगा. दोघांचं नातं शाळेपासूनच खास होतं. अर्जुनच्या आईच्या ट्युएशन क्लासमध्ये भैरवी जायची. दोघे एकमेकांना प्रेमाने ‘करकटक’ आणि ‘कंपास’ अशा टोपणनावांनी हाक मारायचे. शाळेनंतर दोघांचं संपर्क तुटला होता, पण आता… अनेक वर्षांनी अर्जुन तिच्या ऑफिसमध्ये सीनियर म्हणून येतो आणि भैरवीच्या समोर उभा राहतो.
अर्जुनचा स्वभाव गोष्टी साध्या ठेवणारा नाही. परदेशात शिकलेला, उत्साही, बडबड्या आणि अत्यंत स्मार्ट. ऑफिसमध्ये त्याचा अंदाज थोडा खडूस वाटतो. भैरवी आणि अर्जुनमधील मोकळेपणा, जुन्या आठवणी, अर्जुनचा करिष्मा… हे सगळं पाहून अनिशच्या मनात असुरक्षिततेचं वादळ निर्माण होतं. अर्जुनचा भूतकाळातील प्रेमभाव असला तरी तो आजच्या भैरवीच्या संसारात ढवळाढवळ करत नाही – पण त्याचं अस्तित्वच नात्यांमध्ये प्रश्न उपस्थित करतं.
अर्जुनचं आडनाव ‘बेलवलकर’ असल्याने अशोक मामा मालिकेत त्याला मस्करीत ‘आप्पासाहेब’ म्हणताना दिसणार आहेत. नटसम्राट नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखा लक्षात ठेवत! येणाऱ्या भागांमध्ये अशोक मामा आणि अर्जुनमध्ये छान मैत्री फुलताना दिसणार आहे. मुलांमध्येही अर्जुन हळूहळू लोकप्रिय होतो दिसणार आहे आणि ते म्हणजे त्याच्या खेळकर स्वभावामुळे.
आत्तापर्यंत घरात ‘मामा’ बॉस होते, आता ऑफिसमध्ये भैरवी बॉस! अशोक मामा आणि भैरवीचं नातं सुधारलं असतानाच अर्जुनची एन्ट्री नात्यांची समीकरणं बदलणार का? जुन्या मैत्रीतून काही नव्याने फुलणार का? की अनिश आणि भैरवीचं नातं अधिक मजबूत होईल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत “अशोक मा.मा.” मालिकेत… म्हणून पाहायला विसरू नका, सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.