प्राजक्ता माळीचा क्रश कोण ? म्हणाली, "त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा..."
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड पाहायला मिळत आहे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. ११ ऑक्टोबरला रिलीज झालेला ह्या सिनेमाला प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून निर्माती प्राजक्ता माळीने खास व्हिडिओ करून प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
एक व्हिडिओ शेअर करत आणि पोस्ट लिहित प्राजक्ताने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “आजच्या तारखेचा सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे हा… किती आभार मानू? पुण्यातले जवळजवळ सगळेच शोज housefull होताहेत, हे पाहून आनंद गगनात मावत नाहीये. अभिनेत्री म्हणून आनंद आहेच आणि निर्माती म्हणून खूप हायसं वाटायला लागलंय. सबंध महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होतोय, #कृतज्ञ आहे. असाच #लोभअसावा” अशी पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.
प्राजक्ताने शेअर केलेला व्हिडिओ पुण्यातील आहे. बुक माय शो या तिकीट बुकिंग ॲपवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये पुण्यातील अनेक शो हाऊसफुल्ल असलेले पाहायला मिळत आहे. ‘फुलवंती’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, परदेशातही रिलीज झालेला आहे. उत्तर अमेरिकेमध्ये आजपासून हा मराठी सिनेमा रिलीज झालेला आहे. प्राजक्ता सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये थिएटर्स व्हिजिट करताना दिसत आहे. मुंबई, पुणे, ठाणेसह वेगवेगळ्या शहरांत अभिनेत्री जात असून ती प्रेक्षकांना सरप्राईज भेटीही देत आहे.
प्राजक्ता माळीच्या ह्या ‘फुलवंती’ सिनेमाने दोन दिवसांत १ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी आहे. या दोघांसह या चित्रपटात प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे.
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.