प्रियांका चोप्राच्या भावाचा पार पडला साखरपुडा
Siddharth Chopra And Nilam Upadhyay Engagement : प्रियांका चोप्रा कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिलेलं नाव. प्रियांका चोप्राची फक्त भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त अशी फॅन फॉलोविंग आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केल्यापासून अभिनेत्री परदेशात राहते आहे. सध्या अभिनेत्री एकटी भारतात आली आहे. कारण ठरलंय भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या साखरपुड्याचं. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचा साखरपुडा २६ ऑगस्ट रोजी पार पडला. साखरपुड्याचा क्रार्यक्रम साध्या पद्धतीने विधिवत आणि घरच्या घरी पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम…; कोण जिंकेल प्रेमाची लढाई?
सध्या सोशल मीडियावर हे फोटोज् व्हायरल होत असून प्रियंकाच्या चाहत्यांकडून सिद्धार्थ आणि नीलमवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यावेळी साखरपुड्याच्या कार्यक्रमात कुटुंबातील माणसे, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. प्रियंकाने स्वत: भावाच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. शेअर केलेल्या ह्या फोटोंत प्रियंका, तिचा भाऊ, भावाची होणारी बायको आणि प्रियंकाची आई दिसत आहे. त्याशिवाय प्रियंका चोप्राचा आणि त्यांच्या फॅमिलीचा एक जुना फोटोही तिने शेअर केलेला आहे. प्रियंकाच्या भावाने साखरपुडा वडिलांच्या वाढदिवशी केलेला आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंना कॅप्शन दिले की, “… आणि त्यांनी करुन दाखवलं. आमच्या वडिलांच्या वाढदिवशी मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्ठांच्या आशिर्वादाने सिद्धार्थ आणि नीलमचा हस्ताक्षर विधी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आहे.” अशी पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. प्रियंकाच्या वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वीच झालेले आहे. तिने आपल्या फॅमिलीच्या जुन्या आठवणीही इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. त्या फोटोत प्रियंका आणि तिची संपूर्ण फॅमिली दिसते. वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिद्धार्थने आणि नीलमने आयुष्याच्या नवी सुरूवात केली आहे.
दरम्यान, सिद्धार्थ हा प्रियंकाचा सर्वात लहान भाऊ आहे. त्यामुळे साखरपुड्याच्या कार्यक्रमात सिद्धार्थ आणि नीलमने प्रियंकाच्या पाया पडत तिचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, प्रियांका चोप्रा खास भावाच्या लग्न विधींसाठी भारतात आली आहे. यासोबतच लवकरच प्रियंकाचा मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.