सौजन्य- सोशल मीडिया
सध्या झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरादार चर्चा होताना पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेला टीआरपीमध्ये ही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या मालिकेत प्रीतम आणि दिशाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे प्रीतमचं आणि प्रियामधील एकमेकांवरील प्रेम खुलताना दिसत आहे.
कालच्या एपिसोडमध्ये (२६ ऑगस्ट) दिशाने प्रीतम विरोधात कट कारस्थान रचून त्याला किर्लोस्कर कुटुंबीयांच्या मनातून पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिचा तो प्लॅन यशस्वी झाला देखील. कालच्या एपिसोडमध्ये दिशाने तिच्या मित्राला सांगून प्रीतमला खूप दारू पाजली आणि त्याला ऑफिसमध्ये पाठवलं. त्याने इतकी दारू प्यायली की, त्याला क्लाईंटसमोर काय बोलतोय आणि काय नाही याचं साधं भानही नव्हतं. तितक्यात तिथे अहिल्यादेवी किर्लोस्कर येतात. त्यांनी प्रीतमच्या कानाखाली मारली आणि नंतर क्लाईंटची माफी मागितली.
प्रीतम गेल्या अनेक दिवसांपासून दिशासोबत लग्न करण्यासाठी नकार देत आहे. त्याने हा नकार अद्याप तरी त्याच्या आईला सांगितलेला नाही. कारण त्याच्या आईच्या नजरेत दिशा सध्या तरी खूप साधी आणि सोज्वळ अशीच मुलगी आहे. दिशाचं खरं रुप आतापर्यंत प्रीतम, पारू आणि प्रियालाच माहित आहे. आजच्या एपिसोडमध्ये, प्रिया आणि प्रीतम दोघेही एकमेकांच्या प्रेमाला कबुली देणार आहेत. पण त्यांना दोघांनाही न कळता पाठीमागे आदित्य येतो आणि त्यांचं बोलणं गुपचूप ऐकत असतो. त्याला ही दोघांचं एकमेकांमध्ये प्रेम आहे, ही गोष्ट कळते. त्यानंतर आदित्यही आता प्रीतमसोबत दिशाचा खोटा चेहरा आईसमोर आणण्यासाठी त्यांच्या टीममध्ये सामील होणार आहे.
आजपासून पारू, आदित्य, प्रीतम आणि प्रिया हे चौघंही अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर दिशाचा खरा चेहरा आणणार आहेत. आजपासून या मिशनला सुरूवात होणार आहे. आता हे चौघंही अहिल्यादेवी समोर दिशाचा खरा चेहरा कसा आणणार ? दिशाचं पितळ खरं कसं उलगडणार ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काही दिवसांत मिळणार आहे.