१३ वर्षे मोठ्या असलेल्या नसीरुद्दीन शाहवर रत्ना पाठक यांचं कसं जडलं प्रेम; वाचा भन्नाट लव्हस्टोरी
चित्रपटांमध्ये आणि टिव्ही सीरीयलमधील आपल्या अनोख्या भूमिकांसाठी अभिनेत्री रत्ना पाठक यांची बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. रत्ना पाठक यांनी चित्रपट, सिरीयल आणि नाटकच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप निर्माण केली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रत्ना पाठक यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह हे कपल नेहमीच बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. या कपलच्या लग्नाची चर्चा कायमच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होते.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील राज्याभिषेक सोहळा ठरणार खास, अशा पद्धतीने सुरु आहे दोन महिन्यापासून तयारी…
दरम्यान, रत्ना पाठक यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया, नेमकं त्यांचं लग्न कसं झालं याबद्दल जाणून घेऊया. नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच आहे. दोघांची भेट एका नाटकात झाली आणि तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या लग्नामध्ये ना निकाहनामा वाचला, ना सात फेरे घेतले, ना कोणता समारंभ आयोजित केला होता. मग, यांचे लग्न नेमके कसे झाले? हा प्रश्न कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. रत्ना आणि नसीरुद्दीन यांची पहिली भेट १९७५ मध्ये झाली होती. त्यावेळी नसीरुद्दीन यांनी एफटीआयआयमधून पदवी डिग्री घेतलेली तर, रत्ना कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यावेळी दोघेही एका नाटकातच एकत्र काम करत होते.
सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची प्रॅक्टिस करत असताना हे दोघेही एकत्र भेटले होते. नाटकामुळे दोघांचीही चांगली ओळख झाली होती. नाटकाची प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यांचं पहिल्या भेटीतलं प्रेम नव्हतं. आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एकमेकांसोबत व्यवस्थित ओळख झाल्यानंतरच त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. नसीरुद्दीन शाह यांची पहिली पत्नी परवीन मुराद (मनारा सिक्री) ही होती. तिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नसीरुद्दीन आणि रत्ना काही वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर १ एप्रिल १९८२ मध्ये त्यांनी रोमँटिक पद्धतीने लग्न केले. दोघांनीही सात फेरे, निकाहनामा किंवा पाठवणी अशा सगळ्या पारंपारिक विधींना त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे या कपलने थेट कोर्ट मॅरेजच केले होते. रत्ना यांच्या आई दिना पाठक यांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्टात लग्न केले.