कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा...; म्हणाली, "समाजसेवा करणे ही माझी..."
बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका असण्यासोबतच हिमाचल प्रदेशातल्या मंडीची खासदार देखील आहे. अभिनयाप्रमाणेच राजकारणातही कंगना सक्रिय आहे. २०२४ साली लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या तिकीटावर अभिनेत्री बहुमताने निवडून आली आहे. कंगनाच्या राजकीय प्रवासाला जून महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे.
अलीकडेच अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने AiR (Atman in Ravi- आत्मन इन रवी) ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या राजकीय प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. वर्षभरामध्ये अभिनेत्रीला राजकारणात कशापद्धतीने अनुभव आला आहे, याबद्दल भाष्य केलं आहे. दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “मला राजकारण आवडतं, असं मी म्हणणार नाही. कारण, माझ्याकडे राजकारणाची पार्श्वभूमी नाही. तरीही ते काम मला आवडतंय आणि ते मला जमत देखील आहे. मी हे असं यापूर्वी केव्हा काम सुद्धा केलेलं नाही.”
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, ट्रेलर ‘या’ होणार प्रदर्शित
मुलाखतीमध्ये पुढे कंगनाने सांगितलं की, “माझं यापूर्वीचं काम आणि आता मी खासदार झाल्यानंतर माझ्याकडे आलेले काम यामध्ये फार मोठ्यावर फरक आहे. मी अनेकदा महिलांच्या हक्कांसाठी लढली आहे, पण मी खासदार झाल्यानंतरचं माझं काम फार वेगळं आहे. अनेकदा लोकं माझ्याकडे तुटलेल्या गटार आणि नाल्यांच्या समस्या घेऊन येतात. मी त्यांना सांगते की, हा राज्य सरकारचा मुद्दा आहे आणि मी एक खासदार आहे. पण यावर नागरिक म्हणतात, ‘तुमच्याकडे पैसा आहे. तुम्ही त्या पैश्याचा वापर आणि आम्हाला काम करुन द्या.’ ”
आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक, पर्सनल असिस्टंटला केली अटक
कंगनाला भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न मुलाखती दरम्यान विचारण्यात आला. त्या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, “मला वाटत नाही की, मी पंतप्रधान होण्यासाठी सक्षम आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली आवड सुद्धा माझ्यात नाही. समाजसेवा ही माझी पार्श्वभूमी कधीच नव्हती. मी खूप स्वार्थी जीवन जगले आहे. मला एक अलिशान घर, एक लक्झरियस कार आणि हिऱ्यांनी मडवलेले दागिने हवे आहेत. मला चांगले दिसायचे आहे. मी आजवर असंच माझं जीवन जगले आहे.”
कंगना रणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, अभिनेत्री शेवटची ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने या चित्रपटात काम केले असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा केली आहे. चित्रपटात कंगनाने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. अभिनेत्री आता लवकरच ‘तनु वेड्स मनु ३’ आणि ‘इमली’ यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.