Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशाखा सुभेदारचा पॅडी कांबळेला जोरदार पाठिंबा, ‘नखाची किंमत नाही तुला’ म्हणत जान्हवी किल्लेकरला इशारा

पंढरीनाथ कांबळे हे महाराष्ट्राला हसवणारं नाव. आपल्या हास्याने जनतेला आपलंसं करून घेणारा हा अभिनेता आता बिग बॉस मराठी गाजवताना दिसतोय. निक्की अरबाज जान्हवी आणि वैभव या टारगट टोळीला भिडून अनेकांची मनं जिंकून घेत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारने जाहीर पाठिंबा देत जान्हवी किल्लेकरला तिच्या घाण बोलण्याबद्दल इशारा दिलाय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 21, 2024 | 10:00 AM
पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाचा पाठिंबा

पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाचा पाठिंबा

Follow Us
Close
Follow Us:

पंढरीनाथ कांबळेने आपल्या विनोदी टायमिंगने सर्वांनाच आजतागायत हसवलं आहे. सध्या पंढरीनाथ बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये कमाल आणि धमाल करताना दिसून येत आहे. पहिले दोन आठवडे गेम न कळलेल्या पंढरीनाथने तिसऱ्या आठवड्यापासून आपला वैयक्तिक खेळ दाखवून दिलाय. 

गेममध्ये माज दाखवणारी निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण आणि स्वतःची इमेज अत्यंत घाण करून घेणारी अशी जान्हवी किल्लेकर या चौघांनाही आपल्या मस्त टायमिंगने त्रास देणारा पंढरीनाथ सर्वांच्याच मनात घर करताना दिसून येत आहे. पंढरीनाथसाठी त्याची मैत्रिण विशाखा सुभेदार आणि इंडस्ट्रीतील अनेक जणांनी खास पोस्ट केली आहे. मात्र विशाखाने जाहीर पाठिंबा देत पंढरीनाथला खंबीर राहायला सांगितलंय. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

काय म्हणाली विशाखा?

केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना..पॅडी more power to u.

विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर “म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर.

हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही.गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवी साठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं a मुली..तुझा जन्म कदाचित 2000 तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये.

त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला..येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाच्या टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला. 

हेदेखील वाचा – ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक निक्की, जय दुधाणेने मांडले मत!

कमी लेखणं बंद करा…

आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय अत्तापर्यंत.. Game आहे game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात..ताईंनी glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा. जरा बोलताना भान ठेवा. विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, 50 शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो. शांत आहे ह्याचा अर्थ असं नाहीये कीं त्याल सेल्फ respect नाहीये..!

आता थोडं पॅडी बद्दल..

पॅडी माऊली तुझा खेळ तू खूप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आलायस..! इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलंस आज. एक उत्तम reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक…! बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय timing भन्नाट.

निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत. खरंतर जां रोज जा आणि तिचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा! करियर वर बोलायचं नाही.

हेदेखील वाचा – ‘तू पण भवऱ्यासारखी फिरतेय’, अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये वाद!

निक्की गँगवर जनता नाराज

बी टीम ला बऱ्याचदा गेम कळत नाही पण त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांचंच चांगलं आहे आणि ते अत्यंत चांगुलपणाने वागत असल्यामुळेच जनतेचं मन जिंकत आहेत. तर टीम ए अर्थात निक्की गँगवर जनता नाराज असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त ही गँग ट्रोल होत आहे. 

जान्हवीचा माज 

जान्हवी किल्लेकरने मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र घरात गेल्यानंतर तिची ही प्रतिमा पाहून अनेकांना तिला खडे बोल सुनवावे वाटत आहेत. वाट्टेल तशा शब्दात सिनिअर्सना बोलणं, सतत एखाद्याची लायकी काढणं यामुळे ती जास्तीत जास्त ट्रोल होताना दिसतेय. 

Web Title: Actress vishakha subhedar gives support to pandharinath kamble in bigg boss marathi 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.