(फोटो सौजन्य-Instagram)
कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ५’ हा पहिल्या दिवसापासून चाहत्यांची पसंती झाली आहे. आणि या शोमध्ये मराठी इंडस्ट्रीत अनेक दशके काम करणारी अभिनेत्री वर्षा उसगावकरदेखील यामध्ये सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच या अभिनेत्रीचा खेळ प्रेक्षकांना आवडत आहे. परंतु शोमधील स्पर्धक निक्की तांबोळी ज्या प्रकारे त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीवरुन भांडत आहे ते पाहून चाहतेदेखील तिच्यावर रागावले आहेत. कालच्या भागात निक्कीने ताईंसोबत केलेले कृत्य पाहून सर्व स्पर्धकांनी तिच्यावर राग व्यक्त केला आहे.
जान्हवी आणि निक्कीने घेतली वर्षाताईंची जागा
बिग बॉसच्या घरात झोपण्यासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे सगळे स्पर्धक खाली झोपतात. मात्र, जान्हवीने बिग बॉस करंसी ऐवजी बेड घेतल्यामुळे तिच्या एकटीकडे बेड उपलब्ध आहे. बिग बॉसच्या घरात ती पहिल्या दिवसापासून बेडवर झोपत आहे. वर्षा उसगावकर या गेले तीन ते चार दिवस बेडरुमच्या मध्यभागी झोपत आहेत. परंतु त्यांना उगाच त्रास द्यायचा म्हणून निक्की आणि जान्हवी बेड सोडून त्यांच्या जागेवर झोपायला आली. यानंतर निक्की वर्षाताईचे स्लिपिंग बॅग उचलून फेकून टाकते. या सगळ्यात वर्षा या जराही खचून गेल्या नसून, दोघींशी भांडत तेथेच बसतात. ‘हा तर अन्याय’ असं त्या दोघीनाही स्पष्ट म्हणाल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनीही जान्हवी आणि निक्कीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नाहीत. शेवटी वर्षा या बेडरुमच्या दारात जाऊन झोपतात.
हे देखील वाचा- बिग बॉस OTT 3 : अनिल कपूरला राजकुमार राव आणि श्रद्धा म्हणाली ‘सर्वात तरुण आणि योग्य होस्ट’!
जय दुधाणेची शेअर केलेली पोस्ट
जय दुधाणे हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसला होता. आणि तो चाहत्यांना अंतिम खेळाडूमध्ये देखील दिसला होता. आता निक्कीबद्दल त्याने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि त्याने त्यात लिहिले की, “निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीतील आतापर्यंतची सर्वात वाईट स्पर्धक आहे, अभिजित सावंत तुला सलाम कारण जान्हवीला तू दाखवून दिलेस की त्या महाष्ट्राच्या सुपरस्टार अभिनेत्री आहे त्यांच्यासोबत तुम्ही खूप चुकीचं वर्ताव करत आहेत,” पुढे तो म्हणाला की, “माझ्याही सीझनमध्ये भांडणं झाली होती पण मला अजूनही आठवते की आमच्या सीझनमध्ये एकाही स्पर्धकाने वरिष्ठांचा अनादर केलेला नाही’ असे त्याने या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले.
जयची ही पोस्ट पाहून अनेकांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता शनिवारी रितेश भाऊ निक्कीची शाळा घेणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.