
yami gautam
देशातल्या महिलांची सुरक्षा (Woman Safety) या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली जाते. देशातल्या महिला सुरक्षित नाहीत हे आजकाल घडणाऱ्या अनेक घटनांवरून सिद्ध होते. सामान्य स्त्री असो वा अभिनेत्री प्रत्येकीला आयुष्यात विचित्र प्रसंगांना सामोरे जावं लागलं आहे. याच मुद्द्यावर आता अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) भाष्य केलं आहे.
यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशमधील बिलासपुर येथे झाला. लहानपणाासून यामी थोडी लाजरीच होती. ती फारशी बोलत नसे. एका मुलाखतीत तिने लहानपणी घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे. ती म्हणाली की “मला आठवतंय व्हॅलेंटाइन असला की मला थोडं अवघडल्यासारखं व्हायचं, मला ते अजिबात आवडायचे नाही. माझे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे आम्हाला रिक्षातून क्लासला जायला लागायचं, तेव्हा काही मुलं गाड्यांवरून यायची. ते आमच्याकडे एकटक बघत बसायचे, मला विचित्र वाटायचे.”
ती पुढे म्हणाली, “मी एकदा रिक्षातून जात असताना दोन मुलं गाडीवर माझ्या बाजूने जात होते. मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते या गोष्टीचा त्यांना बहुतेक राग आला असावा, कारण त्याने त्याचा एक हात पुढे केला. त्याला कदाचित माझा हात पकडायचा असावा पण मी मात्र त्याच्या कानशिलात लगावली. खरं सांगते इतकं धाडस माझ्यात त्यावेळी कुठून आलं माहिती नाही, ते दोघेदेखील त्या प्रसंगानंतर खूप घाबरले होते. काही काळ त्यांना काय घडलं तेचं बहुतेक समजलं नाही.”
[read_also content=”दिल्लीत दुसरी निर्भया https://www.navarashtra.com/india/the-girl-was-dragged-under-the-wheel-of-a-car-for-4-km-who-is-responsible-for-the-girls-death-nrdm-358550/”]
यामीने अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला आणि स्वप्ननगरी मुंबई गाठली. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. यामीने ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. याशिवाय ‘यह प्यार न होगा कम’ मध्ये गौरव खन्नाबरोबर तिने काम केलं. ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या अनेक चित्रपटातही तिने काम केलं. या चित्रपटांमधील तिच्या कामाला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.