(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडियामुळे कलाकारांवर होणाऱ्या ट्रोलिंगचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकदा चाहते आपल्या आवडत्या कलाकाराच्या बाजूने उभं राहताना इतर कलाकारांचा अनादर करतात. याचंच एक गंभीर उदाहरण अभिनेत्री आहाना कुमराने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केलं आहे. ‘राइज अँड फॉल’ या रिऍलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर, तिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या आल्या असल्याचे तिने सांगितलं.
अभिनेत्री आहाना कुमरा नुकतीच ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडली असून, शोमधून बाहेर पडल्यानंतरचा एक धक्कादायक अनुभव तिनं सर्वांसमोर शेअर केला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या पवन सिंह या भोजपुरी अभिनेत्याशी तिचं अनेक वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. जरी शोदरम्यान त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात आले असले, तरीही शो संपल्यानंतर पवन सिंहच्या काही चाहत्यांकडून आहानाला जीवे मारण्याच्या आणि ऑनलाईन ट्रोलिंगच्या धमक्या मिळाल्या. या प्रकारामुळे अभिनेत्रीला मानसिक त्रास सहन करावा लागला असून, तिनं याबाबत शोच्या निर्मात्यांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत बोलताना आहाना म्हणाली, “माझं एकच वाक्य एवढं त्रासदायक का ठरतंय? आपण कोणत्या जगात जगतोय, असं वाटायला लागलंय.” शोदरम्यान पवन सिंहशी झालेल्या वादानंतर हे ट्रोलिंग सुरू झालं. आहानाने स्पष्ट केलं की, शोमधील गैरसमज मिटले होते. ती पुढे म्हणाली, “मला समजतं की चाहते कधी कधी रागावतात; पण त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या येणं अजिबात योग्य नाही.”
‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण
गर्लफ्रेंड निक्की तांबोळीने अरबाजला ऑन-कॅमेरा झापलं; म्हणाली, ‘खेळाशिवाय तुझं हे काय सुरू …’
‘कॉल माय एजंट’, ‘एजंट राघव’, ‘बेताल’, ‘इंडिया लॉकडाऊन’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय करणारी आहाना कुमरा ही दमदार अभिनेत्री ‘सलाम वेंकी’ या सिनेमात शेवटची झळकली होती. तिच्या प्रामाणिक अभिनयशैलीसाठी ओळखली जाणारी आहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.