(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Nikki Tamboli Support Arbaaz Patel:रिअॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ सध्या जोरदार चर्चेत आहे. शोमध्ये अरबाज पटेल आणि धनश्री वर्मा यांच्यात वाढत असलेली मैत्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचवेळी अरबाजची गर्लफ्रेंड निक्की तांबोळीही या शोमध्ये दाखल झाली आहे. तिच्या प्रवेशानंतर घरातील वातावरण तापले असून, तिनं थेट ऑन-कॅमेरावर अरबाजला सर्वांसमोर फटकारलं. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शोमध्ये अरबाजनं धनश्रीला तिनं घरातील पुरुष स्पर्धकांना समोरून मिठी न मारता, बाजूनं मिठी मारावी, असं म्हटलं होतं. त्याबद्दल अरबाजवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्याच्या त्या वक्तव्यानंतर धनश्रीबरोबरच्या नात्याबद्दलही चर्चा झाल्या होत्या. त्याचबद्दल निक्कीनं त्याला स्पष्टपणे सांगितलं, “तिनं कुणाला समोरून मिठी मारावी की बाजूनं मिठी मारावी, हे सांगणं गरजेचं नव्हतं. खेळाशिवाय तुझं हे काय सुरू आहे, ते बंद कर. बाहेर काय चाललंय, तुला कल्पनाही नाही.”
Shreyas Talpade Upcoming Movie: असुर कितीही असले तरी विजयासाठी एकच “मर्दिनी” पुरेशी असते, श्रेयस तळपदेच्या नव्या चित्रपटाची घोषणा
तिने स्पष्टपणे म्हटलं, “या खेळात तुझी मोठी स्पर्धक कोण असेल, ती धनश्री आहे. या शोमध्ये सर्वांत जास्त नावडती स्पर्धक कोण असले, तर ती धनश्री आहे. गेटच्या बाहेर गार्डलासुद्धा ती आवडत नाही. धनश्रीनं किती वेळा म्हटलंय, “मी अरबाजबरोबर कधी उभी राहणार नाही. ती सुरुवातीला मला आवडायची; पण आता समजतंय की, ती तिचा गेम खेळत आहे.”
‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण
पुढे निक्कीने अरबाजला सांगितलं, “संस्कार आणि आदर या गोष्टी गेमपेक्षा मोठ्या असतात. तू चांगलं वाग. लोक तुला का नापसंत करतात माहीत आहे का? कारण तू खूप शिव्या देतोस. हे तुझ्या कुटुंबीयांनी पाहिलं तर काय वाटेल?”निक्कीनं पुढे अरबाज़चं कौतुकही केलं आणि म्हणाली, “आई, बाबा, आजी यांना तुझा अभिमान वाटतो. तूच या शोमधला नंबर वन स्पर्धक आहेस, हे मी सगळ्यांसमोर ठामपणे सांगते.” निक्कीनं घातलेल्या समजुतीबद्दल सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे.