Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेशमुळे अजय-अतुलला मिळाला ‘हा’ हिंदी सिनेमा, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मोठा खुलासा

‘वेड’ (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलियाने ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली आहे. यावेळी, अभिनेता शुभंकर तावडे आणि संगीतकार जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) हेदेखील उपस्थित होते.

  • By साधना
Updated On: Dec 24, 2022 | 01:37 PM
ved team in kapil sharma show

ved team in kapil sharma show

Follow Us
Close
Follow Us:

रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) ‘वेड’ हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया (Genelia D’souza-Deshmukh) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जिनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ती या चित्रपटाची निर्माती असून रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. आपल्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलियाने ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली आहे. यावेळी, अभिनेता शुभंकर तावडे आणि संगीतकार जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) हेदेखील उपस्थित होते.

कपिल शर्माने अजय-अतुलला रितेशशी त्यांचे इतके दृढ नाते असण्यामागचे कारण विचारले. या अतुल म्हणाला, असं अजिबात नाही की रितेश नेहमी आमच्याकडे येतो किंवा आम्ही त्याच्याकडे जातो. उलट, तो आम्हाला त्याच्यासोबत कायम नेत असतो. आमच्या संगीत प्रवासात रितेशने अनेक निर्मात्यांकडे आमच्या नावाची शिफारस करुन आम्हाला खूप मदत केली आहे. अशी मदत आम्हाला आजपर्यंत कुणीचं केली नाही.

तो पुढे म्हणाला की, मला अजून आठवतंय, साधारण दहा वर्षांपूर्वी रितेशनी आमचं नाव अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना सुचवलं होतं. इतकंच नाही तर त्यांना आमचे संगीत ऐकवत असे आणि मग असे सांगत असे की आम्ही जर त्यांच्या चित्रपटाला न्याय देऊ शकू असा विश्वास त्यांना असला, तर त्यांनी आम्हाला काम द्यावे.  ‘अग्निपथ’ चित्रपट आम्हाला रितेशमुळेच मिळाला. रितेशने आमची ओळख धर्मा प्रॉडक्शन्सची टीम, दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि निर्माता करण जोहरशी करून दिला. आमच्या संगीताची सीडी त्याने ‘अग्निपथ’च्या टीमला ऐकवली. त्यानंतर आम्ही अनेक चित्रपट केले, पण ‘अग्निपथ’ आमच्यासाठी खास आहे. ‘अग्निपथ’मुळे आम्हाला स्वतंत्र ओळख मिळाली. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रितेशने आम्हाला मदत केली.

अतुलच्या या उत्तरानंतर रितेश म्हणाला की, त्यांच्या प्रतिभेमुळे ते मोठे झाले आणि झळकले. त्यांना यश मिळाले ते फक्त त्यांच्या कठोर परिश्रमामुळे! आज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘वेड’च्या टीमला पाहण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Ajay atul comment about riteish deshmukh in kapil sharma show nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2022 | 01:15 PM

Topics:  

  • genelia deshmukh
  • ritesh deshmukh
  • the kapil sharma show

संबंधित बातम्या

Breaking: कपिल शर्माच्या कॅफेवर कॅनडामध्ये पुन्हा फायरिंग, गँगस्टरने घेतली जबाबदारी; म्हणाला ‘आता ऐकलं नाही तर मुंबईत…’
1

Breaking: कपिल शर्माच्या कॅफेवर कॅनडामध्ये पुन्हा फायरिंग, गँगस्टरने घेतली जबाबदारी; म्हणाला ‘आता ऐकलं नाही तर मुंबईत…’

Genelia D’souza Birthday: एका जाहिरातीमुळे जिनिलीयाने मिळवली प्रसिद्धी; जाणून घेऊया रितेश देशमुखसोबत कशी जुळली केमिस्ट्री
2

Genelia D’souza Birthday: एका जाहिरातीमुळे जिनिलीयाने मिळवली प्रसिद्धी; जाणून घेऊया रितेश देशमुखसोबत कशी जुळली केमिस्ट्री

रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; पोस्ट करत आपल्या भावना केल्या व्यक्त
3

रितेश देशमुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; पोस्ट करत आपल्या भावना केल्या व्यक्त

‘या’ कारणामुळे जेनीलिया देशमुख एक दशक चित्रपटांपासून राहिली दूर, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
4

‘या’ कारणामुळे जेनीलिया देशमुख एक दशक चित्रपटांपासून राहिली दूर, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.