Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ‘या’ तारखेला होणार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) निवडणुकीचे वेळापत्रक (Election) जाहीर करण्यात आले आहे. चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर झालेली नाही. त्यामुळे जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर ५ फेब्रुवारीला मतदान होईल.

  • By साधना
Updated On: Oct 13, 2022 | 12:05 PM
akhil bhartiay chitrapat mahamandal

akhil bhartiay chitrapat mahamandal

Follow Us
Follow Us:

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) निवडणुकीचे वेळापत्रक (Election) कोल्हापूरच्या उप धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करून निवडणुकीची प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. मराठी कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर भागधारकांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही सर्वोच्च संस्था (Marathi Artists Organization) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहेत. तसेच ८ फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. संस्थेची नवीन घटना अद्याप स्वीकारली जाणे बाकी असल्याने, पूर्वीच्या घटनेनुसार आणि ठरावाद्वारे निश्चित केलेल्या मतदारांची संख्या केवळ निवडणुकीसाठी वैध असेल.

[read_also content=”अमित ठाकरे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर; निवडणुकीसाठी पक्षबांधणी https://www.navarashtra.com/maharashtra/amit-thackeray-on-tour-to-aurangabad-for-two-days-from-today-so-party-affiliation-for-elections-nrgm-335627.html”]

दरम्यान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळात दावे प्रतिदावे करत दोन्ही गटाकडून निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक रद्द केली होती. धर्मादाय आयुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक नियंत्रक म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली आहे.

चित्रपट महामंडळातील दोन गटातील धुसफूस सुरुच असल्याने मेघराज राजेभोसले यांनी आपणच महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा दावा करत महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक अधिकारी नियुक्त केले. त्यानंतर घोषित केलेली निवडणूक अमान्य असल्याचे सांगत धनाजी यमकर यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करत त्यांनीही निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते.

यामुळे अधिकृत निवडणूक कोणती यावरून संभ्रमावस्था होती. एकाच संस्थेच्या एका महिन्यात दोन निवडणुका तसेच दोन्ही बाजूंनी आमचीच निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकांविरोधात तक्रार केली होती. त्यावर सुनावणी झाली. त्यात धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दोन्ही बाजूंची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती.

दरम्यान, चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर झालेली नाही. त्यामुळे जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर मतदान होईल. त्यात १८ हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील.

Web Title: Akhil bhartiya marathi chitrapat mahamandal election schedule announced nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 11:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.