फोटो सौजन्य - Social Media
संपूर्ण देशभरात ‘हेरा फेरी’ या चित्रपटाविषयी एक वेगळीच क्रेझ आहे. ‘हेरा फेरी’ असो वा ‘फिर हेरा फेरी’ दोन्ही ही अजरामर चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता परेश रावल आणि अभिनेता सुनील शेट्टीसह अनेक दिग्गज कलाकारांनी चाहत्यांच्या मनामध्ये एक स्पेशल जागा तयार केली आहे. पण दरम्यान, परेश रावल यांनी आगामी चित्रपट ‘हेरा फेरी ३’ मध्ये काम करणार नसल्याचे जाहीर केले होते. यानंतर अनेक घडामोडी घडल्या याविषयी अभिनेता अक्षय कुमार यांनी खुलासा केला आहे.
अद्याप, सिनेमा कधी येणार? याबद्दल काही माहिती प्रसारित करण्यात आली नसली तरी अभिनेत्यांमध्ये असणारा वाद आता संपला असल्याचे आणि सर्व काही सुरळीत सुरु झाले असल्याची बातमी स्वतः अभिनेता अक्षय कुमारने दिला आहे. अक्षय म्हणाला आहे की,” आता सर्व काही ठीक झाले आहे. लवकरच, काही तरी चांगलं तुमच्या समोर येणार आहे. हा मध्यंतरी, काही उतार चढाव आमच्यामध्ये झाले असले तरी आता सर्वकाही सुरळीत आहे. आम्ही सर्व आता सोबत आहोत.”
यावर सुनील शेट्टीने देखील प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,” परेश परत आले आहेत. आता सगळं ठीक आहे. काम करण्यास मी उत्सुक आहे. कधी कधी आपलीच नजर आपल्या कामांना लागते.” मुळात, परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ या सिनेमामध्ये काम करण्यास नकार दिला असता. अनेक कायदेशीर प्रक्रियांना त्यांना सामोरे जावे लागले. अखेर सगळं नीट झाले असून चाहत्यांना ‘हेरा फेरी ३’ मोठ्या पडद्यावर कधी दिसणार? असा प्रश्न पडला आहे. अभिनेत्यांच्या प्रतिक्रियेवरून अंदाज बांधता येऊ शकतो की ‘हेरा फेरी ३’ लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.