फोटो सौजन्य – Instagram
हास्य जत्रा फेम आणि अभिनेता निमिष कुलकर्णी याने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याच्या साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. निमिष कुलकर्णी याने लाखात एक आमचा दादा या कार्यक्रमाची क्रिएटिव्ह हेड असलेली कोमल भास्कर हिच्या सोबत साखरपुडा उरला आहे. या दोघांनी हे सोशल मीडिया व त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्या दोघांनीही त्यांचे खास साखरपुड्याच्या दिनी डिझायनर कपडे घातले आहेत. कोमल भास्कर हिने निळा रंगाची साडी तर अभिनेता निमिष कुलकर्णी ज्याने पांढरा रंगाचा कुर्ता घातला आहे.
सोनी मराठी चॅनेलवरील लोकप्रिय शो आणि महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कार्यक्रमातील निमिष कुलकर्णी याने काही एपिसोड काम केले होते. या कार्यक्रमामधून त्याला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमामधून त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
निमिष कुलकर्णी यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की वद बिगिनिंग ऑफ फोरेवर’. या फोटोच्या खाली त्याच्या चाहत्यांनी त्यांना त्याला शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर त्याच्याबद्दल प्रेमदेखील व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये काम करणारा निमिष कुलकर्णी आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, 25 जुलै रोजी त्याचा साखरपुडा पार पडला.
निमिष कुलकर्णी याच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल सांगायचे झाले तर आत्तापर्यंत त्याने सर्वात लोकप्रिय शो म्हणजेच महाराष्ट्राचे हास्य जत्रा हा केला होता त्याच्या सह त्याने अनेक बरीच कामे केली आहेत. स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत देखील त्याने काम केले आहे.
Bigg Boss 19: बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू, सलमान खानच्या शो चा पहिला लुक समोर, बदलला Logo
निमिष कुलकर्णी हा एक अभिनेता आहे पण त्याची पत्नी ही कॅमेरा मागे काम करते. निमिष कुलकर्णी याच्या पत्नीचा संबंध देखील मनोरंजन क्षेत्राशी आहे. ती अनेक मालिकांसाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते. आतापर्यंत तिने वलाखात एक आमचा दादा’ या मालिकेची क्रिएटिव हेड म्हणून काम केले आहे त्याचबरोबर यासह प्रसिद्ध मालिका दार उघड बाई मालिकेच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले आहे.