"...जोवर मी शाहरुख खान बनत नाही तोवर...", अभिनयाच्या जोरावर स्टार का होता आलं नाही? अक्षय खन्नाने केला खुलासा
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचे बलिदान संपूर्ण देशाला माहिती व्हावी, यासाठी ‘छावा’चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक सुरु असताना, चित्रपटातील एक कलाकार सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे, औरंगजेबाची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना… बॉक्स ऑफिसवर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’चित्रपट तुफान यशस्वी ठरला आहे. दरम्यान, हा चित्रपट येत्या दिवसांत आणखी दमदार कमाई करण्याची शक्यता आहे.
रणवीर अल्लाहबादियासह आशिष चंचलानी अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर!
अक्षयने बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे काम करुनही त्याला स्टारडम मिळालं नाही. त्याने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला, तू इतकी वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय राहूनही स्टार का झाला नाहीस, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने त्याने सर्वांचीच बोलती बंद केली आहे. मुलाखतीत रोखठोक प्रत्युत्तर देताना अक्षय म्हणतो, ” मी कधीकधी विचार करतो की, मी एक उद्योगपती आहे आणि मी माझा ५०० कोटींचा बिझनेस सुरु केला आहे. पण जोपर्यंत मी रतन टाटा, धीरुभाई अंबानी किंवा अझीम प्रेमजी बनणार नाही तोपर्यंत मी यशस्वी नाही का? जोवर मी शाहरुख खान बनत नाही तोवर मी यश बघितलं नाही का? मी स्टार बनलोच नाही का? आपल्या १२० कोटींच्या लोकसंख्येत १५-२० लोकांना सिनेमात काम करण्याची संधी मिळते. अजून आपल्याला काय पाहिजे?”
दहाव्या दिवशीही ‘छावा’चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?
असं प्रत्युत्तर देत अभिनेत्याने अनेकांची तोडं बंद केली आहेत. अभिनेत्याच्या ह्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, तेव्हा पासूनच अक्षयच्या अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, अक्षयने औरंगजेबची भूमिका साकारण्यासाठी २ लाख रुपये मानधन स्विकारले आहे. अनेक वर्षांनंतर अभिनयामुळे चर्चेत राहिलेला अक्षय खन्नाने २००० ते २०१५ पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, अक्षयने ‘दिल चाहता है’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘तीस मार खान’, ‘दृश्यम २’, ‘इत्तेफाक’, ‘आर्टिकल ३५६’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. अक्षय खन्नाने मोठा ब्रेक घेत ‘छावा’ निमित्त पुन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. परंतु अभिनेत्याने केलेल्या ह्या दमदार कमबॅकची जोरदार चर्चा होत आहे.