रणवीर अल्लाहबादियासह आशिष चंचलानी अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर!
‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये आई- वडिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सोमवारी म्हणजेच आज युट्यूबर रणवीर अलाहबादियासोबत प्रसिद्ध कॉमेडीयन आशिष चंचलानीला महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. हजर राहिल्यानंतर त्या दोघांचेही आज जबाब नोंदवण्यात आले. रणवीर आणि आशिष या दोघांनाही नवी मुंबईतल्या महापेमधील महाराष्ट्र सायबर मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
दहाव्या दिवशीही ‘छावा’चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?
रणवीरने शोदरम्यान कुटुंब आणि पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह्य आणि अश्लील टिप्पणींमुळे हा वाद उफाळून आला होता. युट्यूबरने केलेल्या ह्या विचित्र वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत शोच्या निर्मात्यांवर आणि सहभागी यूट्यूबर्सवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, आता महाराष्ट्र सायबर सेलकडून शोच्या निर्मात्यांसह शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांवरही चौकशी केली जात आहे. आक्षेपार्ह्य आणि अश्लील टिप्पणीची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. त्याच चौकशीसाठी आज रणवीर आणि आशिषला बोलवण्यात आले होते.
‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि आशिषचे जबाब नोंदवले जात असून त्यांच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे. यूट्यूब शो दरम्यान अश्लील टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली रणवीरसह इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची महाराष्ट्र सायबर पोलिस चौकशी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबरला तो देत असलेल्या कंटेंटबद्दल फटकारले होते. तथापि, न्यायालयाने रणवीरला अटकेपासून दिलासा दिला असून त्याला चौकशीत सामील होण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने रणवीरला म्हटले होते की, जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, तेव्हा तुला चौकशीसाठी हजर व्हावे लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केल्यानंतर, रणवीर विरोधात त्या विधानासाठी कोणताही नवीन गुन्हा दाखल केला जाणार नाही.
दरम्यान, रणवीर अलाहबादियाला ते विधान चांगलंच भोवलं आहे. या विधानानांतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. शिवाय त्याच्या फॅन फोलोविंगमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यापूर्वीही सायबर सेलकडून काही वेब शो आणि पॉडकास्टवर आक्षेपार्ह्य विधानामुळे मोठे वाद निर्माण झाले आहेत, मात्र रणवीर अलाहबादिया आणि आशिष चंचलानी यांच्यासारख्या मोठ्या प्रभावशाली डिजिटल काँटेंट क्रिएटर्सच्या बाबतीत असे घडल्याने यावर अधिक गंभीरपणे विचार केला जात आहे. हा वाद कुठवर जाईल आणि या प्रकरणाचा शेवट काय होईल, याकडे संपूर्ण इंटरनेटचं लक्ष लागलं आहे.