"त्याच्या विविधतेला मी नमन करतो..." बिग बी बच्चन यांनी अभिषेक बच्चनचं केलं खास कौतुक; पोस्ट व्हायरल
अभिनेता अभिषेक बच्चन हा बॉलिवूडचे शहनशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक चित्रपटामुळे चर्चेत नसला तरीही देखील त्याची कायमच इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये स्वत:चं स्थान पक्कं केलं आहे. आज अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये डेब्यू करुन २५ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त अभिषेक बच्चनसाठी अमिताभ यांनी खास पोस्ट शेअर केलेली आहे.
अखेर ‘Hera Pheri 3’ मध्ये परतणार ‘बाबू भैय्या’? परेश रावल यांनी दिला इशारा, चाहते झाले खुश
दरम्यान, अभिषेक बच्चनने ‘रिफ्युजी’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ३० जून २००० साली प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन जे. पी. दत्ता यांनी केलं होतं. अभिषेकच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं अख्ख्या बॉलिवूडने कौतुक केलं होतं. आज अभिषेकला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लाडक्या लेकाच्या बॉलिवूड पदार्पणाला आज २५ वर्षे झाल्यामुळे अमिताभ यांनी खास एक्स पोस्ट शेअर केलेली आहे. अमिताभ यांनी अभिषेकचे केलेले कौतुक नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
कमी रक्तदाबामुळे तुमच्या जीवाला धोका? ‘कांटा लगा’ अभिनेत्रीच्या मृत्यूमागे ‘हे’ कारण?
दरम्यान, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “टीम अभिषेक” नावाच्या फॅन पेजने अभिषेक बच्चनच्या विविध पात्रांचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यावर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “ज्या पद्धतीने अभिषेकने विविध धाटणीची पात्रे साकारली आहेत, त्याचे मला कौतुक वाटते. या विविधतेला मी नमन करतो. मी त्याचा बाप आहे आणि माझ्यासाठी माझा मुलगा अभिषेक कौतुकास पात्र आहे.” अभिषेक बच्चनच्या अनेक फॅन्सने या व्हिडिओवर कमेंट केली असून सध्या अभिनेत्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
‘Sardaar Ji 3’ चा पाकिस्तानमध्ये डंका; दोन दिवसात निर्माते मालामाल, दिलजीतने दिली प्रतिक्रिया
अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच अभिषेक बच्चन ‘कालीधर लापता’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याचा हा आगामी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसून ‘Zee 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४ जुलै २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.. काही दिवसांपूर्वीच, अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे अनेक सेलिब्रिटींनी, समिक्षकांनी आणि चाहत्यांनीही भरभरुन कौतुक केले होते. यासोबतच अभिषेक लवकरच शाहरुख खानसोबत मधुमिता दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची शुटिंग सध्या मुंबईत सुरु आहे.