अनुराग कश्यपसाठी देवदूत ठरला 'हा' प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता, मुलगी आलियाच्या लग्नासाठीही नव्हते पैसे
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची गणना केली जाते. कायमच स्पष्टवक्तेपणासाठी जाणल्या जाणाऱ्या या दिग्दर्शकाने मार्च २०२५ मध्ये बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच अनुरागने मुंबई शहर सोडत, बंगळुरूमध्ये राहत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अनुरागच्या लेकीचा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याबद्दल दिग्दर्शकाने वक्तव्य केलं आहे. ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शकाने आपल्या लेकीच्या लग्नाबद्दल फार महत्वाचं विधान केलं आहे.
‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाच भाषणांमध्ये होणार प्रदर्शित; केव्हा होणार रिलीज ?
‘द हिंदू’च्या ‘द हडल’ शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग कश्यपने खासगी आयुष्यातील एक भावनिक अनुभव शेअर केला आहे. अलीकडेच अनुरागच्या लेकीचं लग्न झालं. ऐन लेकीच्या लग्नाच्या वेळेसच त्याच्याडे आर्थिक चण चण होती. तो आर्थिकदृष्ट्या इतका कठीण परिस्थितीत होता की, लग्नासाठी आवश्यक असलेली रक्कमही त्याच्याकडे नव्हती. या कठीण काळात त्याच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील नाही तर टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार अनुरागच्या मदतीला धावून आला होता. तो अभिनेता होता विजय सेतुपती…
वडीलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने सांगितलं खरं कापण; म्हणाला, “आईची इच्छा होती की…”
मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यपने सांगितलं की, “मी ‘इमाइका नोडिगल’नंतर अनेक टॉलिवूड चित्रपटांना नकार दिला होता. दर दोन दिवसांनी तरी का होईना, मला ऑफर येतच होत्या. पण मी सर्वच ऑफर्स धुडकावून लावल्या होत्या. मी सनी लियोनी आणि राहुल भट्टच्या ‘केनेडी’ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात व्यग्र होतो. त्याच दरम्यान माझी विजय सेथुपतीसोबत भेट झाली. त्याने मला सांगितलं की त्याच्याकडे खूप चांगली स्क्रिप्ट आहे, ज्यात मी असावं अशी त्याची इच्छा आहे. पण मी सुरुवातीला नकारच दिला होता.”
कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थांसाठी ‘आता थांबायचं नाय!’ प्रेरणादायी चित्रपटाच्या खास शोचे आयोजन
सलग चित्रपटांना नकार दिल्यानंतर माझं एक दिवशी सहज विजयसोबत आलियाच्या लग्नाबद्दल चर्चा झाली होती. मी त्याला सांगितलं होतं की, पुढच्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, पण मला वाटत नाही की, मी तिच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलू शकेल. हे ऐकून विजय म्हणाला, ‘मी आहे ना, मी तुझी मदत करतो’ आणि मला विजयच्या ‘महाराजा’ या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली.” अनुरागची लेक आलिया कश्यपने डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईत लग्न बंधनात अडकली. आलियानं तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत लग्न केलं होतं. अनुरागच्या मुलीने वयाच्या २३ व्या वर्षी तिचा बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली.