Aata Thambaycha Nai Movie Special Screening
‘शिकायला वयाचं बंधन नसतं, गरज असते फक्त इच्छाशक्तीची’, हा महत्वाचा संदेश देण्यासाठी मासूम या संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘आता थांबायचं नाय!’ या प्रेरणादायी चित्रपटाच्या खास शोचे आयोजन केले आहे. शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही वयोमर्यादा नसते आणि प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे, याची आठवण करून देणारा ‘आता थांबायचं नाय!’ हा मराठी चित्रपट दादर येथील एका सिनेमागृहात दाखवण्यात आला. या खास शोला संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज वायचळ दिग्दर्शित हा चित्रपट सध्या थांबायचं नावच घेत नाहीए. ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाने दुसऱ्या यशस्वी आठवड्यात पदार्पण केले असून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट भावतोय.
‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाने अनेकांना भावनिकरित्या स्पर्श केला. एका सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष, त्याची शिकण्याची जिद्द, आणि शिक्षण कसं त्याच्या आयुष्याला कलाटणी देते, हे सर्व दाखवत असतानाच, उपस्थितांनी वारंवार टाळ्यांच्या गजरात आपली प्रतिक्रिया दिली. अनेकांनी कार्यक्रमानंतर आपल्या मनोगतातून चित्रपटाने दिलेली प्रेरणा सांगितली. मासूम संस्थेने हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमध्येही ‘शिक्षणाची ठिणगी’ पेटवण्यासाठी ही कल्पना राबवली.
सध्या या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. अनेक दिग्गजांच्या भूमिका असलेला हा चित्रपट सध्या अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड मिरवत आहे. मनोरंजसोबतच अतिशय सुरेख संदेश या चित्रपटुन देण्यात आला आहे. कधी हा चित्रपट प्रेक्षकांना खदखदून हसवतोय, तर दुसऱ्या क्षणी प्रेक्षकांना भावुक बनवतोय. चित्रपटगृहाबाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक दमदार आणि उत्कृष्ट कलाकृती पाहिल्याचा आनंद आहे. या चित्रपटाचे कौतुक समीक्षक, प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी केले आहे. त्यामुळे कोणीही चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
एल्विश यादवच्या अडचणी वाढ; उच्च न्यायालयाने दिला पहिला धक्का, आता नोएडा पोलिस युट्यूबरचा फास आवळणार!
झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, श्रीकांत यादव, किरण खोजे, दीपक शिर्के , प्रवीण डाळिंबकर, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.