(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने बॉलिवूडच्या सद्यस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्याने नुकतंच चांगल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी मुंबई सोडून दक्षिणेकडे जाण्याच्या निर्णयामुळे चर्चेत असताना प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडवर त्यांच्या कामावरून ताशेरे ओढले आहे. बॉलिवूडची सध्याची नफ्याची मानसिकता, रिमेक बनवणं आणि स्टार मेकिंग संस्कृतीवर टीका केली आहे. यामुळे सर्जनशीलता कमी होते आणि कलाकृतींमध्ये नाविन्य नसतं, असं मत अनुरागने मांडलं.
‘संगीत मानापमान’मध्ये पाहायला मिळणार अमृता खानविलकरच्या नृत्याची झलक, मोहमयी नजाकतीने वेधलं लक्ष
‘पुष्पा: द राइज’ किंवा ‘पुष्पा २: द रुल’ यांसारखे चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये कोणाचंच डोकं नाही, असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला. सध्याच्या कलाकारांना अभिनयात कमी आणि लवकरात लवकर स्टार बनण्यामध्ये जास्तीत रस आहे, असं म्हणत त्याने नवख्या कलाकारांचे चांगलेच कान टोचले आहे. हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने सांगितले की, बॉलिवूडला आता कोणत्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाही. “त्यांना काहीही कळत नाही. ते ‘पुष्पा’सारखा चित्रपटही बनवू शकत नाही. कारण त्यांच्याकडे तितकं डोकंच नाहीये.”, असं अनुराग मुलाखतीत म्हणाला
तारक मेहतातल्या भिडे मास्तरच्या लेकीने बांधली लग्नगाठ, Video सोशल मीडियावर व्हायरल…
मुलाखती दरम्यान पुढे अनुराग कश्यप म्हणाला, “मुख्य गोष्ट म्हणजे, त्यांना चित्रपटनिर्मिती म्हणजे काय ? हेच त्यांना कळत नाही. दिग्दर्शक सुकुमारंच ‘पुष्पा’सारखा चित्रपट बनवू शकतात. टॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्दर्शकांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यांना चित्रपट बनवण्यास सक्षम केलं जातं. बॉलिवूड प्रत्येकजण स्वत:चं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना स्वत:चं विश्व तरी माहितीये का आणि त्यात त्यांचं अस्तित्व किती लहान आहे हे तरी माहितीये का? हा त्यांचा अहंकार आहे. जेव्हा तुम्ही स्वत:चं विश्व निर्माण करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हीच देव आहात.”
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द रुल’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात १७६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन शिवाय, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिलही आहे. विशेष म्हणजे ‘पुष्पा: द रुल’ हा तेलगू चित्रपट असूनही हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतात आतापर्यंत चित्रपटाने ११७१.४५ कोटी रुपये कमावले आहेत, त्यापैकी ७६५.१५ कोटी रुपये फक्त हिंदीतून कमाई झाली आहे. त्याचा पहिला भाग ‘पुष्पा: द राइज’ 2021 साली आला आणि त्या चित्रपटानेही चांगली कमाई केली.