"हो, मी बाबा होणार आहे...", ५७ वर्षीय अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा होणार; अभिनेत्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाज खानने डिसेंबर २०२३ मध्ये, शुरा खानसोबत निकाह केला होता. तब्बल २२ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत अभिनेत्याने संसार थाटला आहे. आता त्याचीही दुसरी पत्नी लवकरच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देणार आहे. शुरा आणि अरबाज हे दोघंही क्लिनिक बाहेर एकत्र दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये शुरा प्रग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सर्व त्या चर्चांवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिलेली आहे.
शुरा खान आई होणार असल्याचं वृत्त स्वत: अरबाजने सर्वांबरोबर शेअर केले आहे. शुरा प्रेग्नेंट आहे का ? तू बाबा होणार आहे स का ? असा प्रश्न अरबाज खानला विचारण्यात आला होता. ‘ई- टाइम्स’सोबत बोलताना अरबाजने शूरा खानच्या गरोदरपणावर पुष्टी केली आहे. तो म्हणाला, “होय, हे प्रेग्नेंसीचं वृत्त खरं आहे. मी ते नाकारत नाही, कारण आता सर्वांनाच त्याबद्दल माहिती आहे. आमच्या दोघांसाठी हा खूपच रोमांचक काळ आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. माझ्या कुटुंबाला त्याबद्दल माहिती आहे. आता इतरांनाही त्याबद्दल माहिती होत आहे आणि ते ठीक आहे. ते देखील स्पष्ट होत आहे.”
अखेर ‘Panchayat 4’ चा ट्रेलर रिलीज; वेब सिरीज वेळेआधीच होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख!
अरबाज खान नर्व्हस आहेस का ? या प्रश्नाचं उत्तर देताना अरबाज म्हणाला की, “होय, नर्व्हस तर वाटतंच आहे, अनेक वर्षांनंतर मी वडील होणार आहे. ही माझ्यासाठी एकदम नवीन भावना असल्यासारखंच वाटत आहे. मी उत्साहित आहे. पण तेवढीच उत्सुकताही आहे. या बातमीमुळे माझ्यात आनंदाची आणि जबाबदारीचीही भावना निर्माण झाली आहे. मला हे खूप आवडतंय. मी कसा बाबा होईन हे आपण कुठल्या कॅटेगरीत मांडू शकत नाही. तुम्हाला फक्त चांगला पालक होण्याचा प्रयत्न करायचा असतो. जो आपल्या बाळासाठी कायम उभा असेल, त्याच्याकडे लक्ष ठेवून असेल, काळजी घेणारा अशेल, प्रेम करणारा असेल आणि त्याला हवं ते पुरवणारा असेल. हेच मला करायचं आहे.”