Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 05, 2026 | 04:16 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘द केरळ स्टोरी’ च्या सीक्वेलची कथा आणखी असेल भयानक
  • ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ कधी होणार प्रदर्शित?
  • ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ काय असेल स्टारकास्ट?
 

विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लिमिटेड यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी २’, ज्याचे अधिकृत शीर्षक ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ आहे, याच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ही कथा पुन्हा एकदा वास्तवातील सत्य घटनांवर आधारित असून, खऱ्या पीडितांचे आवाज, सर्वांसमोर असूनही दडपल्या गेलेल्या सत्य कथा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकते. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये नव्या कलाकारांची निवड करण्यात आली असून, त्यांचा अभिनय साधा, प्रामाणिक आणि भारताच्या जमिनीवरील वास्तवाशी जोडलेला आहे.

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला

सनशाईन पिक्चर्स लिमिटेडने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत एक मोशन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरवर लिहिले आहे, ‘त्यांनी सांगितले, ही फक्त एक कथा आहे. त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तिला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. पण सत्य थांबले नाही. कारण काही कथा कधीच संपत नाहीत. या वेळी कथा आणखी खोलवर जाणार आहे, या वेळी वेदना अधिक तीव्र होणार आहेत. ‘ असे लिहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे.

 

‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ कधी होणार प्रदर्शित?

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने संपूर्ण देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती आणि बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. आता ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ पुन्हा एकदा अधिक प्रभावी, सशक्त आणि व्यापक कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फ्रँचायझींपैकी एक ठरलेला हा चित्रपट प्रेक्षकांकडून जबरदस्त पाठिंबा मिळवत आहे, २०२६ मधील सर्वात मोठ्या थिएटर रिलीजपैकी एक मानला जाणारा हा चित्रपट आहे. यावेळी हा चित्रपट भारताच्या विविध भागांतील सत्य घटनांवर आधारित आहे.

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाईन पिक्चर्स लिमिटेडच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंग यांनी केले असून, आशीष ए. शाह यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Vipul amrutlal shahs beyond the kerala story goes deeper film set for february 27 2026 release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • the kerala story

संबंधित बातम्या

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’
1

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

धर्मेंद्रजींच्या निधनानंतर का ठेवल्या वेगळ्या शोकसभा? अखेर हेमा मालिनींनी सोडले मौन; म्हणाल्या, ‘हा आमचा वैयक्तिक प्रश्न…’
2

धर्मेंद्रजींच्या निधनानंतर का ठेवल्या वेगळ्या शोकसभा? अखेर हेमा मालिनींनी सोडले मौन; म्हणाल्या, ‘हा आमचा वैयक्तिक प्रश्न…’

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!
3

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!
4

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.