अरबाज खानने (Arbaaz Khan) गेल्या महिन्यात आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अभिनेत्याने डिसेंबर 2023 मध्ये त्याची गर्लफ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. आता तो करिअरमध्ये पुढे जाताना दिसत आहे. सध्या अरबाजकडे एक चित्रपट आहे, ज्यामध्ये तो नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘सेक्शन 108’, जो सिनेमावाला प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. लग्नानंतर अभिनेत्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. याबद्दल अरबाजने आनंद व्यक्त केला आहे.
[read_also content=”प्रियांका चोप्रा झळकणार हॉलीवूड चित्रपटात, ‘द ब्लफ’ मध्ये साकारणार मुख्य भूमिका, जूनपासून सुरू होणार शूटिंग! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-will-worked-next-russo-brothers-produced-film-the-bluff-as-per-report-nrps-501189.html”]
अरबाज खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो ‘सेक्शन 108’मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल अरबाजने आनंद व्यक्त केला आहे.
तो म्हणाला, ‘या चित्रपटाची स्क्रिप्ट अप्रतिम आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर मला मिळालेला हा पहिलाच चित्रपट आहे. नवाजुद्दीन आणि अरबाज व्यतिरिक्त रेजिना कॅसॅंड्रा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटात अरबाज खान एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची भूमिका खूपच प्रभावी आहे. सध्या चित्रपटाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग सुरू आहे. अरबाज खानने 22 जानेवारीला लोणावळ्यात शूटिंग केलं होतं. या चित्रपटात अरबाजच्या उपस्थितीबद्दल प्रॉडक्शन टीमही उत्सुक आहे.