
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. रिलीजच्या दिवशी या चित्रपटाने केवळ 5 कोटी 9 लाख रुपयांचा व्यवसाय केला. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली असून चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 7 कोटी 5 लाखांचा व्यवसाय (Article 370 Box Office Collection Day 2) केला आहे. रिलीजच्या दुस-या दिवशी कमाईत 27 टक्क्यांची वाढ पाहिल्यानंतर आता तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन आणखी चांगले होऊ शकते, असे मानलं जात आहे.
[read_also content=”बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करियरला सुरुवात, आज शाहीद आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; ‘इतकी’ आहे नेटवर्थ! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-started-his-career-as-a-background-dancer-know-about-his-movies-and-net-worth-nrps-510257.html”]
‘आर्टिकल 370’ चं दुसऱ्या दिवशीचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन किती?
ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर दिग्दर्शित हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. इब्राहिम बलोच दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट केवळ 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.75 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटानं चित्रपटाची आतापर्यंत 13 कोटी 41 लाखांची कमाई झाली आहे.
चित्रपटाबद्दल सांगायचं तर, आर्टिकल 370 जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. यामीने या चित्रपटात इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. यामी आणि प्रियामणी यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री देखील स्वतःच्या बळावर चित्रपट कसा उत्कृष्ट बनवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट.
यामीसाठी हा चित्रपट खूप खास आहे कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान यामीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली. मात्र, ट्रेलर लॉन्च होईपर्यंत त्यांनी हे गुपित ठेवलं. ट्रेलर लाँचदरम्यान दोघांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली.