Asha Bhosle : 1034 विकेट्स घेणारा गोलंदाज अन् आशा ताईंचा आवाज; 'या' प्रसिद्ध गाण्यामागचं 'तो' प्रसिद्ध किस्सा माहित आहे का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आशा ताईंचे क्रिकेट विश्वासी अतिशय खास नाते होते. त्यांनी एका क्रिकेटपटूसोबतही हिंदी गाणे गायले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या क्रिकेटपटूने देखील आपल्या कारकिर्दीत हजारोहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आशा भोसले यांनी हे गाणे २००६ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान गायले होते.
हे गाणे अवघ्या साडेचार तासांत रेकॉर्ड करण्यात आले होते. एक ऑस्ट्रेलियन मुलाग भारतीय मुलीच्या प्रेमात पडल्यावर काय होते यावर आधारित हे गाणे आहे. आशा ताईंनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत यू आर द वन फॉर मी हे गाणे गायले आहे. हे गाणे खुद्द ब्रेट लीने हिंदीमध्ये गायले होते.
मैदानावर १०३४ विकेट्स घेणाऱ्या ब्रेटलीने आशा ताईंसोबत गायलेले हे गाणे आजही क्रिकेट आणि संगीत प्रेमींच्या आवडीचे आहे. ब्रेट लीच्या गोलंदाजीसोबतच त्याची आशा ताईंसोबतची केमिस्ट्री चाहत्यांनी भोवली होती.
आशा ताईंचे भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात खेळाडू सचिन तेंडूलकरशी अतिशय घट्ट नाते होते. त्या सचिनला आपल्या मुलाप्रमाणे मानायच्या. त्यांनी अनेकदा म्हटले होते की, सचिन केवळ उत्तम खेळाडून नाही, तर अत्यंत नम्र आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्या सचिनचा उल्लेख क्रिकेट विश्वातील महानत कलाकार म्हणून करत. त्यांनी सचिनसोबतही Duet गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय आशा ताई भारताचे माजी दिग्गज फलंदाच सुनील गावस्कर यांच्याही चाहत्या होत्या.
Asha Bhosle Passes Away : आशाताईंचे ‘ते’ गाणं ज्यावर घालण्यात आली होती बंदी, पण आज आहे क्लासिक Hit






