Asha Bhosle Passes Away : आशाताईंचे 'ते' गाणं ज्यावर घालण्यात आली होती बंदी, पण आजही आहे क्लासिक Hit (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आशा भोसले यांनी आपल्या आपल्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. सध्या त्यांच्या कारकिर्दीतील एक सर्वात गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या गाण्याची चर्चा पुन्हा एका समोर आली आहे. या गाण्यावर १९७१ मध्ये बंदी घालण्यात आली होती, ते म्हणजे ‘दम मारो दम’.
१९७० च्या दशकात प्रदर्शित झालेले देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील गाण्याने प्रचंड धुमाकू घातला होता. आर. डी बर्मन यांचे संगीत आणि आशाताईंच्या आवाजातील जादूने तरुणाईला भुरळ घातली होती. या चित्रपटांत एकापेक्षा एक अधिक गाणी होती. मात्र संगीत प्रेमी दम मारो दम या गाण्याच्या प्रेमात बुडाले होते. मात्र या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.
या गाण्यात अभिनेत्री झीनत अमानला हिप्पी अवतारात आणि नशेच्या धुंदीत दाखवण्यात आले होते. या गाण्यामुळे नशेला प्रोत्साहन मिळत असल्याचा यावर आरोप त्यावेळी करण्यात आला होता. यामुळे या गाण्याला रेडिओ आणि टेलिव्हीजनवर वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती.
मात्र या गाण्यावर बंदी असूनही याची क्रेझ कमी झाली नाही. आज हे गाणे बॉलीवूडच्या क्लासिक गाण्यांपैकी एक मानले जाते. आजच्या पिढीला देखील हे गाणे ऐकायला आणि त्याच्या तालावर थिरकायला आवडते.
आशा ताईंनी माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी चला चला नव बाळा हे गाणे गायले होते. यानंतर त्यांनी हंसराज बहल यांच्या चुनरिया चित्रपटातील सावन आया गाणे गाऊन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आशा ताईंनी संगीत, पॉप, गझल, भजने, भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली अशा अनेक प्रकारची गाणी गायली आहेत.






