Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मामा समुद्रासारखे…”, अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना रसिका वाखारकर काय म्हणाली ?

'कलर्स मराठी'च्याच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील 'अशोक मा.मा' या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 06, 2024 | 09:08 PM
"मामा समुद्रासारखे...", अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना रसिका वाखारकर काय म्हणाली ?

"मामा समुद्रासारखे...", अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना रसिका वाखारकर काय म्हणाली ?

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’ पूर्वी रोहित शेट्टीच्या ‘या’ चित्रपटांनी केला १०० कोटींचा टप्पा पार

‘अशोक मा.मा.’ या मालिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली ,”पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. पण आता ‘अशोक मा.मा’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी मामादेखील खूप आग्रही होते. मामांसोबत कॅमेरा शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते. मामा समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. सेटवर त्यांनी अगदी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. मामांसोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे हीच माझ्यासाठी खूप भारी गोष्ट आहे.”

हे देखील वाचा – जगातली पहिली विश्वसुंदरी काळाच्या पडद्याआड, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘अशोक मा.मा.’ या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली ,”भैरवी मुजुमदार असं माझ्या पात्राचं नाव आहे. अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशी ही मुलगी आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. आधी साकारलेल्या सावीपेक्षा अतिशय वेगळं पात्र मी साकारणार आहे. अशोक मा.मा. या पात्रासोबत भैरवी वाद-विवाद घालताना दिसेल. अर्थात त्यालासुद्धा तितकचं स्ट्राँग कारण आहे. वेगळी गोष्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांप्रमाणे आता मलाही उत्सुकता आहे”.

‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. पहा, नवी गोष्ट ‘अशोक मा.मा.’, 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.

Web Title: Ashok ma ma tv serial saavi urf actress rasika vakharkar shares her experience working with actor ashok saraf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • ashok saraf

संबंधित बातम्या

भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
1

भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं
2

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात
3

Video : “एक नंबर मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

Eknath Shinde Honors Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीचा गौरव!
4

Eknath Shinde Honors Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीचा गौरव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.